
नांदेड। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वंशज श्री.शाहु छत्रपती हे इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. श्री शाहु छत्रपती यांच्या विजयासाठी नांदेड येथुन स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते नांदेड येथुन कोल्हापूर येथे दाखल झालेले आहेत.
मागील चार दिवसांपासून स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर च्या अनेक गावांमध्ये जाऊन श्री शाहु छत्रपती यांच्या समाजाप्रती असलेली वेदना,काळजी लक्षात घेता, आपला माणूस म्हणून वारसा गादीचा, विचाराचा आपल्या छत्रपतींचा सांगत प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी झालेले आहेत. विजयाची गुढी ही श्री शाहु छत्रपती यांचीच उभारु असा सर्व स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प केला असल्याचे संस्था अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या सोबतच तिरुपती भगनुरे,सदा पाटील पुयड, मंगेश कदम समवेत स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आजपर्यंत कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती परीवाराने मराठा आरक्षण असेल किंवा महाराष्ट्रातील ईतर प्रश्नासोबतच कोल्हापूर वाशियांच्या विकासासाठी मोठे योगदान श्री शाहु छत्रपती यांचे राहिलेले आहे, मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना सर्व प्रथम आंतरवाली येथे जावून भेट देणारे पहिले व्यक्ती श्री शाहु छत्रपती हेच आहेत. यामुळेच नांदेड येथुन स्वाभीमानी संभाजी ब्रिगेड ची संपुर्ण टीम कोल्हापुरात दाखल होवुन आपल्या परीने वाडी,तांडे, गावागावात जाऊन प्रचारात व्यस्त झालेली आहेत अशीही स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांनी सांगितले.
