नांदेड| नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन च्या सहकार्याने व महाराष्ट्र टग ऑफ वॉर असोशिएशन च्या अधिपत्याखाली व टग ऑफ वॉर फेडरेशन ऑफ इंडिया च्या नियमानुसार 24 वी सब ज्युनिअर, ज्युनिअर मिक्स गट व सिनिअर पुरुष (बीच)राज्यस्तर टग ऑफ वॉर अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 03 ते 05 नोव्हेंबर 2023 दरम्यान येथे आयोजित श्री नूतन माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय दोंडाईचा दोंडाईचा शिंदखेडा, जि.धुळे येथे करण्यात आले असून राज्यस्तर स्पर्धेतुन निवडलेला संघ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व पालघर येथे दिनांक 04सप्टेंबर ते 09 डिसेंबर 2023 दरम्यान येथे होणा-या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी हाईल.
त्या अनुषंगाने नांदेड जिल्हा टग ऑफ वॉर असोशिएशन ची सब ज्युनिअर, मुले, सब ज्यू,ज्युनिअर मिक्स व सिनिअर पुरुष (बीच)टग ऑफ वॉर जिल्हास्तर स्पर्धा व निवड चाचणी दिनांक 29/10/2023 रोजी सकाळी 11 वाजता जिजाऊ सृष्टी सिडको येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नांदेड जिल्हा संघाची निवड करण्यात येईल. ज्या खेळाडुंना सहभागी होण्याचे आहे अशा सर्व खेळाडुंनी उपस्थितीत राहावे असे आवहान संघटनेचे अध्यक्ष बालाजी शेळके शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जिल्हा सचिव जनार्दन गुपिले, आर टी रामन बैनवाड प्रा डॉ .राहुल वाघमारे प्रा. डॉक्टर रमेश नांदेडकर विनोद जमदाडे बालाजी शेनेवाड विशाल गडंबे यांनी केले आहे