नवीन नांदेड| दिपावली निमित्ताने प्रथम सत्र संकलीत मुल्यमापन अंतर्गत १ ली ते ४ थी विधार्थीनी आकाश कंदील, पणत्या, फुलाचे हार तयार करून आणले होते या उपक्रमात अनेक विधार्थीनी सहभाग नोंदवला.
३ नोव्हेंबर रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळ ऊमरदरी संचलित नरसिंह विद्या मंदिर प्राथमिक शाळा सिडको नांदेड येथे प्रथम सत्र संकलीत मूल्यमापन अंतर्गत वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांनी उपक्रम व कृती या साधना अंतर्गत दिपावली निमित्ताने आकाशकंदील, मातीपासून बनवलेल्या पणत्या, व दिवे,तसेच फुलाचे हार तयार करणे असे उपक्रमसाठी विद्यार्थ्यांनी वरील वस्तू स्वतः तयार करून आणल्या होत्या या उपक्रमात अनेक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
सर्व वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना एकुंडवार यांनी सर्व उपक्रम व कृती ची पाहणी करून विद्यार्थी व वर्ग शिक्षकांचे कौतुक केले.