
नांदेड। सध्या जाणवत असलेल्या रक्तदान शिबिराची टंचाई व उन्हाचा पारा ४३° सें एवढा चढलेला असुन सूद्धा दिनांक ०६/०६/२०२४ रोज गुरुवार शिवराज्याभिषेक दिननिमित्त, शनी महाराज जन्मोत्सवनिमित्त व साईबाबा मंदीर येथील अर्पण रक्तकेन्द्रतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात महिलांनीही सहभाग घेतला.
या शिबिरात अनुक्रमे ५१, २१,२१ असे एकूण ९३ रक्तदात्यानी रक्तदान केले. रक्तदात्याचे या शिबिरास अर्पण रक्तकेंद्राचे संचालक व मनसे जिल्हाध्यक्ष मा. मॉन्टीसिंग जहागीरदार, संचालक श्री सुदर्शन अदमनकर सर, संचालक कृष्णा भुसेवाड सर व सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी अथक परिश्रम घेतले. यावेळी सर्व रक्तदात्यास छत्री व सन्मानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले.
