
नांदेड। स्वरमेघ संगीत समुहाच्या संचालिका तथा सुप्रसिद्ध गायिका मेघा गायकवाड-जोंधळे यांच्या संकल्पनेतून स्वरसम्राज्ञी भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजलीपर तेरे सुर और मेरे गीत संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रम गुरूवार, दि. 29 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता कुसुम सभागृह, नांदेड येथे प्रसिद्ध ख्यातनाम गायक व संगीतकार प्रमोद सरकटे संभाजीनगर यांच्या प्रमुख सहभागात संपन्न होणार आहे. यावेळी मराठवाड्याच्या सुप्रसिद्ध गायिका मेघा गायकवाड-जोंधळे, गायिका पल्लवी (हैद्राबाद), गायक सर्वश्री मंजूर हाशमी, अतुल कौठकर (अहमदनगर), डॉ. राजेश पतंगे आणि डॉ. सिद्धार्थ जोंधळे हे सुरेल गीत सादर करणार आहेत. कार्यक्रमाची निर्मिती इंजि. संजीवन गायकवाड यांची असून सौ. स्मिता मोहरीर यांचे निवेदन असणार आहे.
तेरे सुर और मेरे गीत कार्यक्रम प्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती ज्योती बगाटे-धुतराज, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, वस्तू व सेवाकर विभागाचे उपायुक्त निलेश शेवाळकर यांची विशेष उपस्थिती व मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच यावेळी शंतनु डोईफोडे, गोवर्धन बियाणी, केशव घोणसे पाटील, अनिल कसबे, राजेंद्र हुरणे, डॉ. हंसराज वैद्य, अॅड. गजानन पिंपरखेडे, उद्योगपती राम तुप्तेवर, डॉ. दिलीप फुगारे, प्राचार्य केशव जोंधळे यांची उपस्थिती लाभणार आहे.
रसिकांसाठी देणगी प्रवेशिका डॉ. वैद्य रूग्णालय वजिराबाद चौरस्ता, गजाननबाबा रेडिमेड सरपंचनगर पाटीसमोर मालेगाव रोड, नांदेड या ठिकाणी उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी रसिकांनी कृपया इंजि. संजीवन गायकवाड (मो-9422892161) यावर संपर्क साधावा.
