नांदेड l जिल्हा विधी सेवा प्राधिकरकरन व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २७.जुलै २४ रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारत मध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी महापालिकेचे मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा मार्फत नोटीस बजावन्यात आल्या होत्या.

त्यानुषंगाने दिनांक २७ जुलै २४ रोजी सकाळी १०.३० वाजे पासुन लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे, न्यायाधिश श्री अर्जुन बी. जाधव (पॅनल प्रमुख) यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या व मालमत्ता धारकांच्या तक्रारीचे निरसन केले. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये एकूण ११३५ मालमत्ता धारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८०% सुट योजनेचा लाभ घेवुन एकुण रु.३,६९,०१,२४८/- (रुपये तीन कोटी एकोणसत्तर लक्ष एक हजार दोनशे अड्ठेचाळीस) एवढा मालमत्ता कराचा भरणा केला आहे.

या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्यासह न्यायाधिश अर्जुन बी. जाधव (पॅनल प्रमुख), ॲड.पी.बी. वाघमारे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, उपआयुक्त (महसुल) स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त (कर) सदाशिव पतंगे, मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी संजय जाधव, डॉ.मिर्झा फरहतुल्लाह बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, निलावती डावरे, न्यायालयीन कर्मचारी एस.व्ही. शेटकार, सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.

ज्या मालमत्ता धारकांनी मनपा मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणाऱ्या जप्तीची कार्यवाही टाळावी असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मालमत्ता धारकांना केले असुन या लोक अदालतीच्या आयोजनासाठी उपयुक्त स.अजितपालसिंघ संधु व कर विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version