नांदेड। राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत माती संकलन करणे तसेच अमृत कोपरा तयार करणे हे उपक्रम शासकीय तंत्रनिकेतन येथे नुकतेच घेण्यात आले. तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर, सहसंचालक उमेश नागदेवे यांच्या निर्देशानुसार संस्थेत एनएसएस अंतर्गत अमृत कलश ठेवून त्यामध्ये माती संकलीत करण्यात आली. तसेच संस्था परिसरात अमृत कोपरा तयार करुन त्यामध्ये विविध रोप लावण्यात आली.

हा उपक्रम प्राचार्य डॉ. नागेश ल. जानराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजकार्याचा भाग व्हावा. समाज कार्यात आपला सक्रीय सहभाग असावा. विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडावे, तसेच प्रत्येकांनी एक रोप लावून त्याला जगवावे असे त्यांनी विद्याथ्यांना सांगितले. यावेळी  विद्यार्थ्यांना पंचप्राण शपथ देण्यात आली. या कार्यक्रमास प्रबंधक श्रीमती ए.व्ही. कदम, अधीक्षक जी.के.जमदाडे, सर्व विभाग प्रमुख, विभाग नियंत्रक, विभाग समन्वयक, एसएसएस कार्यक्रम अधिकारी ए.एन. यादव, एस.एन.नरवाडे, व्ही.सी.साळुंके, सहाय्यक ज्योतिका बगाटे व इतर अधिकारी कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version