भोकर,गंगाधर पडवळे| शहरात व तालुक्यात दिवसेंदिवस आवैध दारू,सिंधी,मटका,गुटखा विक्री हे जोरात सुरू असून या धांदेवल्यांना पोलीस प्रशासनाचे भय राहील नाही की काय..?अशी परस्थिती निर्माण झाली असून, त्याचं बरोबर चोऱ्या, ,मोटार सायकल चोरी हेही मागे नाहीत. त्यामुळे नागरिकात याविषयी भीतीचे वातावरण तयार झाले.यावर अनेकवेळा बातम्या, फेसबुकवर लिहूनही काही परिणाम होत नव्हता त्यामुळे कि काय पोलीस प्रशासनाने या कामासाठी वेगवेळ्या प्रकारे पथक नेमून यावर आळा घालण्यासाठी गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून भोकर मध्ये सिंधी पकडुन महिन्यातील दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.यामुळे थोडेफार का होईना जनतेच्या रोषाला तात्पुरता लगाम लागला असेच म्हणावे लागेल.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की आज दि.१४/१२/२०२३ रोजी भोकर शहरातील नागापूर रस्त्यावर सिंधी असलेला ऑटो असल्याची खात्री लायक गुप्त माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील, पोहिका नामदेव जाधव,साई अरकीलवार,महिला पोलीस पवार,पोह मोईन यांच्या पथकाने धाडसी कारवाई करत जवळपास दहा हजार रुपयाची सिंधी,व पन्नास हजाराचा रियर ऑटो असा एकूण साठ हजाराचा मुद्देालासह जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत चंद्रकलाबाई जिंकलवाड व अन्य दोन आरोपी असल्याची माहिती दिली आहे.विशेष म्हणजे याच महिन्यात ५ तारखीला त्याचं आरोपीन कडून सिंधी व टेंपो मिळून एकूण सात लाखाच्या मुद्देमालासह मिळून आला होता व कारवाई ही झाली परंतु नऊ दिवसातच पुन्हा सिंधी पकडल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील सुजाण नागरिक,पत्रकार,समाज सेवक हे अवैध धंद्द्या बद्दल बोलत आहेत,लिहत,आहेत परंतु याकडे संबधित विभागाचे, पोलिसांचे विशेष लक्ष वेधले गेले नाही यामुळे शहरात उलटसुलट चर्चा ही अनेकवेळा होत असते विषेतः अवैध दारू,सिंधी,गांजा, गुटखा हे शाळा, कॉलेज परिसरात,अशा अतिशय संवेदनशील ठिकाणी खुलेआम विक्री होत आहे याचाच परिणाम म्हणून शाळकरी,अतिशय कमी वयातील, लहान मुले व्यसनाच्या आहारी जाऊन ज्या वयात हातात वही,पुस्तक घेवून ज्ञान आत्मसात करून आपले जीवन घडवायचे असते त्यावयात ते वाया जात आहेत तर कित्येकजण तारुण्यात आपला जीव गमावून बसले आहेत. अनेकांचे सुखी संसार या कारणाने धुळीस मिळाले. अनेकदा व्यसनी प्रवृत्तीच्या व्यक्ती ह्या गुन्हेगारी कडे वळताना दिसून येतात. या कारवाईने नागरिकांच्या मनात एक आशेचा किरण निर्माण झाला असून संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, स्थानिक पोलीस प्रशासन, अधिकारी कर्मचारी यापुढेही असेच अवैध धंद्यावर अविरत कारवाई सुरू ठेवून गुन्हेगारी ला आळा बसावा अशी माफक अपेक्षा जनतेतून यानिमित्ताने समोर येत आहे.