हदगाव तालुक्यातील प्रदूषण करणारे डांबर प्लाँट व क्रेशर तात्काळ बंद करा तहसिल समोर आमरण उपोषण
हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यातील तळेगाव परिसरात क्रेशर (खडी मशीन ) व डांबर प्लाँट त्वरीत महसुल विभागाने सील करावे. म्हणून या गावातील बबन भालेराव यानी तहसिल समोर दि २६ डिसेंबर पासुन आमरण उपोषाणला बसलेले आहे.
त्यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मौजे तळेगाव ता. हदगाव या परिसरात क्रेशर (खडी मशीन) च्या आवाजा मुळे ध्वनी प्रदुषण तर होतच आहे, या मशीनच्या ब्लास्टींग मुळे नागरिकांना त्याचा ञास होत आहे. डाँबर प्लाँटच्या धुरामुळे वायु प्रदुषण नागरिका़च्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
इतकेच नव्हे तर ब्लास्टींगच्या आवाजा मुळे व डाँबर प्लाँट मुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आरोग्यवर ही परिणाम होत असुन या गावातील बोअर विहीर हे गळून पडत असल्याच त्यांनी दिलेल्या निवेदनात केलेल आहे. या बाबतीत क्रेशर व डाँबर प्लाँटच्या संबंधितांना या बाबतीत अनेक वेळा या संबधी आवगत करण्यात आले परंतु या क्रेशर व डाँबर प्लाँट संबंधित राजकीय दृष्ट्या व प्रशासनाचे आभयदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात क्रेशर चालकांकडून प्रदूषण होते आहे.