मुंबईमध्ये राहणारी शबनम शेख मुस्लीम सनातनी मुलगी रामल्लाच्या दर्शन सोहळ्याची साक्षीदार होण्यासाठी पैदल अयोध्येला निघाली
मुंबई| मुंबईमध्ये राहणारी शबनम शेख नावाची ही मुस्लीम सनातनी मुलगी बिनीत पांडे आणि रमणराज शर्मा या आपल्या दोन मित्रांसमवेत अयोध्ये मध्ये होणाऱ्या रामल्लाच्या दर्शन सोहळ्याची साक्षीदार होण्यासाठी पैदल अयोध्येला निघाली आहे. मजल दरमजल करत ती दररोज २० ते २५ किमी पैदल प्रवास करते आहे. ठिकठिकाणी सर्वधर्मियांकडून तिचे स्वागत व अभिनंदन केले जात आहे.
येत्या २२ जानेवारीला आयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी देशभरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. देशभरातील भाविक यासाठी आयोध्येकडे प्रस्थान करीत आहेत. शबनम दोन मित्रांसह मुंबई येथून पायी अयोध्येला निघाली आहे.
भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, याबाबत एका बाजूने विचार न करता दोन्हीहीबाजूंनी विचार केला जावा, अशी अपेक्षा शबनमने व्यक्त केली. लहानपणापासून रामायण कानावर पडले. त्यामुळे प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल मनात आदरभाव व उत्सुकता आहे. प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आणखी जाणून घेताना रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्या वारी सुरू असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. या तीनही युवकांनी आपल्यासोबत, ग्रीन इंडिया, क्लीन इंडियाचे बॅनर घेऊन स्वच्छतेचाही संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.