नवीन नांदेड। वंचित बहुजन युवकाचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्ये रमाई चौक सिडको येथे युवाआघाडी, नांदेड दक्षिण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व रमाई चॅरिटेबल ट्रस्ट भिमवाडी व युवकांचा, महिला पदाधिकारी यांच्या वतीने रमाई चौक सिडको येथे ढोल ताशा व फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये भव्य दिव्य स्वागत करण्यात आले,या वेळी दुतर्फा युवकांनी व समाजबांधवांनी जल्लोष मध्ये स्वागत करुन घोषणा दिल्या.
लोहा येथे आयोजित निर्धार सभेसाठी सुजात आंबेडकर हे मोटार सायकल रॅली व्दारे लोहा येथे वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा दक्षिण आयोजित निर्धार मेळाव्यासाठी जात असतांना वंचित बहुजन आघाडीच्ये युवा नेते सुजात आंबेडकर यांच्ये नांदेड येथे आगमन झाले होते, २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मोटार सायकल रॅलीचे बळीरामपुर नांदेड ते लोहा मार्ग आयोजित केली होती, प्रारंभी सुजात आंबेडकर यांनी माता रमाई चौक येथे पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित जनसमुदाय यांचा वतीने घोषणा देण्यात आल्या. यावेळी वंचित युवा आघाडीच्यातर्फे रमाई चौक सिडको येथे भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा आघाडीचे प्रदेश सदस्य अक्षय भाऊ बनसोडे, युवा नेते सुदर्शन कांचनगिरे, सुखा सिंग टाक, शुद्धधन कापशीकर,राज बुद्धे, बालाजी गायकवाड, वैभव लष्करे, स्वप्निल साखरे ,रवी मस्के, गजानन वाघमारे, माधव देवकांबळे,अमोल लांडगे, डॉक्टर गणेश जोंधळे, रणवीर कांबळे, आकाश चित्ते अमोल शिरसे, सरफराज, सुमित कोकरे पंकज हटकर, आशिष सोनकांबळे, बलमा मस्के, सचिन लांडगे, गोलू गोलू गजभारे,तर दक्षिण महानगर आघाडीच्या तर्फे दक्षिण महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, रवि पंडित, अमृत नरंगलकर, साहेबराव भंडारे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष विनायक गजभारे , नंदकुमार गच्चे, संजय निळेकर, यांच्या सह युवकांनी जल्लोष मध्ये स्वागत केले, यावेळी रमाई चॅरिटेबल ट्रस्ट भिमवाडी यांच्या वतीने ही सुजात आंबेडकर यांच्ये स्वागत करण्यात आले,यावेळी रस्त्याच्या दुतर्फा मोठया प्रमाणात युवकानी गर्दी केली होती.
अनिल वाघमारे व पदाधिकारी यांनी गोपाळ चावडी कमान,तर शाहु नगर येथे सम्राट आढाव ,प्रदीप हणवंते , दिपक ननावरे,आशिष टेळकीकर, किरण सोनसळे,व पदाधिकारी व महिला मंडळाच्या सुजाता आढाव, पवळे ताई, बहादुरे ,गवळताई ,युवाकांनी , यांनी ढोल ताशा व फटाक्यांचा आतिषबाजी करून भव्य स्वागत केले.तर लोहा येथे निर्धार सभेसाठी जात असताना कावळा ऊस्मानगर, भोपाळवाडी व प्रत्येक गावातील मुख्य रोडवर भव्य स्वागत करण्यात आले.