हिमायतनगर। सध्याच्या डिजिटल युगात सुलेखनाची कला लोप पावत आहे. त्यामुळे माझी शाळा माझा फळा समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तिसरे राज्यस्तरीय अक्षर संमेलन नुकतेच घेण्यात आले आहे. त्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात हिमायतनगर येथील रामराव पाटील सूर्यवंशी यांची नात तथा स्टार प्रवाह वरील मी होणार सुपरस्टार जल्लोष जुनियर्सचा फेम विद्यार्थिनी कु. श्रीमयी श्रीनिवास सूर्यवंशी हिचा कोल्हापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याबद्दल हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांतून तिचं अभिनंदन केले जाते आहे.
      
माझी शाळा माझा फळा समूह व शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभाग कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 3 रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दिनांक 24 ते 26 मे या दरम्यान नुकतेच कोल्हापूर विद्यापीठ येथे संपन्न झाले. या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी येथील कुलसचिव डॉ. व्ही.एन.शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी पंढरीच्या वारी प्रमाणे ही अक्षर संमेलनाची वारी होत राहावी,अशी अपेक्षा व्यक्त केली,  याचं कार्यक्रमात हिमायतनगरची भूमीकन्या कु. श्रीमयी श्रीनिवास सुर्यवंशी हिच्यासह नांदेड चे नंदकुमार दामोदर ओतारी यांना सुद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सोबतच वृंदा आवडण, मिताली सुर्वे, अलकनंदा परिहार, शीतल गंधक, ज्योत्स्ना पाटील, मनीषा कदम, प्रतीक पानसरे, गणेश तुपे, आदी ३० कलाकारांना राजस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव कैलास बिलोणीकर, महसूल व वनविभागाचे सहसचिव  संजय इंगळे आदि उपस्थित होते .या वेळी संगीत व नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी स्वागत केले. अमित भोरखडे यांनी प्रास्ताविक केले. दीपक इरकर यांनी सूत्रसंचालन केले. संमेलनाध्यक्ष सतीश उपळावीकर यांनी आभार मानले. 
     
कु.श्रीमयी सुर्यवंशी ने नृत्य कले प्रमाणे आपल्या सुंदर हस्ताक्षराने माझी शाळा माझा फळा या समूहाचे प्रमुख अक्षरगुरू श्री.अमित भोरकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षरांच्या दुनियेत आपला ठसा उमटवला व हा पुर र प्राप्त केला व उपस्थीत सर्व कलाकारांनी व उपस्थीत सर्व मान्यवरानी तिचे खुप कौतुक केले .व पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा दिल्या.
     
श्रीमयी या विद्यार्थ्यांची निवड होऊन पुरस्कार मिळाल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, शेतकरी नेते बाबुराव कदम कोहळीकर व हिमायतनगर येथील श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ, नित्य योग परिवाराचे अक्कलवाड सर, वराडे सर, बाळासाहेब चौरे, सुभाष बलपेलवार,साहेबराव अष्टेकर, रमेश कदम यांच्यासह जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार, मराठी पत्रकार संघाचे जिल्हा संघटक प्रकाश जैन, हिमायतनगर मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिरांणे, गोविंद गोडसेलवार, सोपान बोंपिलवार, आदींसह हिमायतनगर येथील अनेक नागरीकांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थीनी श्रीमयीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version