उस्माननगर, माणिक भिसे| येथून जवळच असलेल्या मौजे शंभरगाव ता.लोहा येथील गावच्या पोलीस पाटील रिक्त पदासाठी सुमेध अशोकराव डाकोरे यांची नियुक्ती झाली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे समर्थक रामराम सोनसळे लाटकर यांच्या साढुचे चिरंजीव सुमेध अशोकराव डाकोरे यांची पोलीस पाटील जागेसाठी उपविभागीय अधिकारी यांनी घेण्यात आलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रिया लेखी व तोंडी मुलाखत, परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शंभरगाव ता . लोहा येथील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदी उच्चशिक्षित तरूणाची निवड झाली. शंभरगाव लोहा ता. येथील पोलिस पाटील यांची जागा ही अ.जा.सर्वसाधरण साठी राखीव गटातून सदरील उच्च शिक्षित सुमेधची निवड झाली आहे. सुमेध डाकोरे यांची पोलीस पाटील म्हणून निवड झाली आहे. 

बद्दल मधुकर माधवराव डाकोरे ( क कृषी उत्पन्न बाजार समिती लोहा संचालक ) , रामराव सोनसळे लाटकर ( माजी सभापती प.स.कंधार प्रतिनिधी , तथा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष ) तुकाराम डाकोरे , अशोक डाकोरे, धम्मानंद डाकोरे ,कपिल डाकोरे, राजेंद्र वाघमारे ,बाळासाहेब डाकोरे, शेषराव दत्ता ढेंबरे,गुंडेकर , पत्रकार माणिक भिसे,लक्ष्मण कांबळे पोखरभोसीकर , राहुल दत्ता ठेबंरे यांच्यासह अनेकांनी त्यांचे अभिनंदन आदी मान्यवर व मित्र मंडळ यांनी. उच्चशिक्षित तरुणांची निवड झाल्याबद्दल तालुक्यांमधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version