हिमायतनगर,अनिल मादसवार| बंजारा समाजाचे दैवत, थोर समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांची २९५ वि जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. हिमायतनगर शहरात गोर बंजारा समाजातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली होती. दिनांक १५ रोजी सकाळी 11 वाजता हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मैदानात सर्व समाज बांधव एकत्र जमले. या ठिकाणी महिला व पुरुषांच्या वतीने आपल्या बोली भाषेत लेंगी गीत प्रदर्शन केलं. या कार्यक्रमा सादर करण्यात आलेल्या लेंगी गीता आणि पारंपरिक वेषभूषेतून बंजारा संस्कृतीचे शहरवासीयांना दर्शन घडून आले. सदरील जयंती कार्यक्रमाला बंजारा समाज बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोर बंजारा संघटनेतर्फे दुपारी 12 वाजता गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभाऊं चव्हाण यांचं आगमन हिमायतनगरात झाले. त्यानंतर बैलगाडी मधून संत सेवालाल महाराज व रामराव महाराज यांची प्रतिमा ठेवण्यात येऊन श्री परमेश्वर मंदिरापासून रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या बंजारा कॉलनी पर्यंत हलगीच्या तालावर भव्य मिरवणूक काढण्यात आली.

संत सेवालाल महाराज जयंती मिरवणुकीत सामील झालेल्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने श्री परमेश्वर मंदिर मुख्य कामानिजवळ सरबताचे वितरण करण्यात आले. बंजारा कॉलनी येथील संत सेवालाल महाराज यांच्या नियोजित मंदिराच्या जागेचे भूमिपूजन राष्ट्रीय अध्यक्ष संदेशभाऊं चव्हाण यांचं हस्ते करण्यात आले. यावेळी गोरसिकवाडी तालुका संयोजक डॉ दामोधर राठोड, राम राठोड, बाबुराव सकवान, बंडूसिंग पवार, कैलास राठोड, सुनील चव्हाण, प्रमोद राठोड, लखन जाधव आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती..

दरम्यान काढण्यात आलेल्या सॅन सेवालाल महाराज जयंती मिरवणुकीत युवकांनी हाती संत सेवालाल महाराज यांची प्रतिमा असलेला झंडा घेऊन मिरवणुकीत सेवालाल महाराजांच्या गीतावर ठेका धरला होता. यावेळी एकच लाल सेवालाल…रामराव महाराज कि जय,,, अश्या घोषणांनी हिमायतनगर शहर परिसर दणाणून निघाला. या जयंती सोहळ्यात गोरसेंना, गोरसिकवाडी, हिमायतनगर तालुक्यातील बंजारा सामाजातील नायक, कारभारी,, व्यापारी, राजकीय पदाधिकारी, युवा वर्ग, तसेच बंजारा समाजातील महिला पुरुष समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. जयंती सोहळा आनंदाने साजरा व्हावा यासाठी पोलीस निरीक्षक एस डी जरड यांनी तीन सहाय्यक पोलीस निरीक्षक व 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान हिमायतनगर शहरातील संत सेवालाल महाराज जयंती मिरवणुकीला वेळ असल्याने हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बंजारा कॉलनी परिसरात असलेल्या नियोजित संत सेवालाल महाराज मंदिर स्थळी सुरु असलेल्या लेंगी नृत्य कार्यक्रमाच्या ठिकाणी भेट देऊन सेवालाल महाराज जयंतीच्या शुभेच्छा देऊन पुढील तालुक्याला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन सूर्यवंशी, शहराध्यक्ष संजय माने, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, चेयरमन गणेशराव शिंदे, डॉक्टर राजेंद्र वानखेडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस आशिष सकवान, भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, योगेश चिलकावार, संजय सूर्यवंशी, अब्दुल बाखी, सुभाष शिंदे, पंडित ढोणे व बंजारा समाज बांधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version