हिमायतनगर,प्रतिनिधी| हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथे वृत्तसंकल करण्यासाठी गेलेले डिजिटल मीडिया परिषदेचे पत्रकार गजानन जिद्देवार यांना मारहाण करून जीवघेणा हल्ला करणाऱ्या रेती माफियाला तात्काळ अटक करण्यात यावी. त्यांचे भ्रमणध्वनी वरील कॉल डिटेलचे CDR काढुन त्यांना सहकार्य केलेल्या सर्वांना सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी एका निवेदनाद्वारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता पंडीतराव देशमुख यांनी केली आहे.

दगांव येथील पत्रकार गजानन जिद्देवार यांचेवर हिमायतनगर तालुक्यातील विरसनी येथील वाळु माफीयांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हि बाब लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे मनोधैर्य, हिम्मत खचवनारी निंदनीय घटना आहे. यातील आरोपी असलेल्याने राजकीय पदाचा गैरवापर करून महसूल अधिकारी यांना हाताशी धरून शासनाच्या गौण खनिजाची चोरी करून साठेबाजी केली होती. हा प्रकार पत्रकार जिद्देवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विरसनी, कामारी, पिंपरी परिसरातील अवैद्य रेती साठे जप्त करून त्या साठ्यातील रेती गोरगरीब घरकुल लाभार्थी यांना शासनाच्या धोरणानुसार मोफत वाटप करण्याची मागणी केली होती.

त्यांच्या तक्रारीची दाखल घेऊन महसूलच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार यांनी रेती साठे जप्त करून त्याचा लिलाव आणि घरकुल धारकांना वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याची माहिती मिळाल्यावरून आष्टी ता. हदगांव येथील पत्रकार गजानन जिद्देवार हे वृत्तसंकलन करण्यासाठी विरसनी येथे गेले होते. यावेळी त्यांनी ते अवैद्य रेती साठ्याचे फोटो व व्हिडीओ फुटेज घेत असताना आरोपी शेख अफरोज, सोनू देवसरकर आणि त्याचे साथीदार यांनी संगनमत करून रेतीसाठ्याची तक्रार देणारा तूच पत्रकार आहेस का..? आमच्या तालुक्यात येऊन शहाणपणा करतो का असे म्हणत लाथा बुकय्या, लाठ्या काठ्याने बेदम मारहाण केली. तसेच गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेत ट्रैक्टर अंगावर आणून जीवे मारण्याचा प्रयत्न केला तसेच जिद्देवार यांचे दोन मोबाईल फोडून नुकसान केले होते.

यावरून पोलिसांनी गुन्हा दखल केला तरी त्या रेतीमाफियाना अटक न करता अटक पूर्व जामिनासाठी मोकाट सोडले असल्याचा संशय असून, आरोपीना राजकीय नेत्यांचे आणि पोलिसांचे अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. रेती माफिया आरोपी काहीं लोकाच्या संपर्कात राहुन रेती साठे करणे याबरोबर तक्रार करणाऱ्या पत्रकारास मारण्याचा कट रचत होते. तेंव्हा आरोपींच्या मोबाईलचे CDR काढून संबंधीताचा गुन्ह्यात समावेश करुन त्यांना सहकार्य करणार्यांना सहआरोपी करावे. अन्यथा पत्रकारासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहारचे जिल्हाप्रमुख विठ्ठलराव कल्याणकर (देशमुख) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख दत्ता पंडीतराव देशमुख यांनी दिला आहे. त्यांनी या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड, जिल्हा पोलीस अधिक्षक नांदेड, तहसीलदार हिमायतनगर यांना दिल्या आहेत.

पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांवर पत्रकार सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा – मराठी पत्रकार संघाची मागणी


विरसनी येथील राजकिय पदावर असलेल्या वाळु माफीयाने आपल्या एका साथीदारांसह इतर आठ ते दहा जणांनी संगनमत करून पत्रकार गजानन जिद्देवार यांच्यावर जीवघेणा हल्ला करून गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. या घटनेला आठवडा उलटला असून, अद्याप पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. पत्रकारावर हल्ला करणाऱ्यांविरुध्द पत्रकार सरंक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन, तात्काळ आरोपीना अटक करावी. आणि पत्रकारांवर होणारे हल्ले थांबवावे अश्या मागणीचे निवेदन हिमायतनगर पोलीस निरीक्षक यांना मराठी पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हा संघटक परमेश्वर गोपतवाड, डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल मादसवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. या निवेदनावर गोविंद गोडसेलवार, अशोक अनगुलवार, सोपान बोंपिलवार, ज्ञानेश्वर पंदलवाड, मारोती वाडेकर, दिलीप शिंदे, धम्मपाल मुनेश्वर, नागेश शिंदे, परमेश्वर काळे, माधव काईतवाड, सुनील द‌मकोडवार आदींसह अनेक पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version