नांदेड| डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्थापीत पिपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलीत नागसेन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रभातनगर नांदेड या शाळेचे माजी व आजी विद्यार्थी यांची बैठक ॲड.बाळासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली होती. सदरील बैठकीत श्रीपती ढोले सर हे प्रदिर्घ सेवा करून दि.31 डिसेंबर 2023 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. ते त्यांच्या सेवा कार्यकाळात अनेक विद्यार्थी संस्कारमय घडवलेत. डॉक्टर, इंजिनिअर क्लासवन अधिकारी म्हणून उच्च पदावर गेले. अशा आदर्श शिक्षकाचा गौरव व्हावा अशी बैठकीत चर्चा करण्यात आली.

साधक बाधक सखोल चर्चेअंती गौरव समीती स्थापन करण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला. त्यात अध्यक्ष म्हणून रविदादा गायकवाड तर महासचिव म्हणून मोहनदादा लांडगे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष सुमेध गायकवाड, डॉ.नरेश उम्रजकर, विशाल सुर्यवंशी, मनिषा कदम, डॉ.विश्वलता कांबळे, ॲड.बाळासाहेब शेळके, सचिव प्रा.सिद्धार्थ खंदारे, लक्ष्मीकांत तेले, विजयश्री प्रविण वाघमारे, विजय बगाटे, विनोद हटकर, कोषाध्यक्ष धनश्री रविकांत बुकटे, प्रसिद्धी प्रमुख म्हणून दिपांकर बावस्कर यांची निवड करण्यात आली आहे.

समीतीत सदस्य व पदाधिकारी वाढण्याची शक्यता आहे. त्याचे पूर्ण अधिकार अध्यक्ष यांना देण्यात आले आहे. शेवटी प्रा.सिद्धार्थ खंदारे यांनी सर्वांचे आभार मानले व बैठक संपल्याचे अध्यक्षाच्या परवानगीने जाहीर केले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version