निवडणूक दूत डॉ. सान्वी जेठवाणी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा

नांदेड| महाराष्ट्र राज्याचे निवडणूक दूत झाल्यापासून नांदेड येथील कलावंत व सामाजिक कार्यकर्ता डॉ. सान्वी जेठवाणी मतदार जागृती विषयी अनेक उपक्रम राबविले नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा झाला त्यानिमित्ताने त्यांनी विविध सामाजिक उपक्रम आयोजित करून आपला वाढदिवस साजरा केला.
प्रथमतः त्यांच्या हस्ते श्री झुलेलाल गणेश मंडळ बाफना येथे त्यांच्या हस्ते महाआरतीचा आयोजन करण्यात आलं होतं श्रींचे दर्शन आशीर्वाद रुपी सुरुवात करून पुढे त्यांनी अनाथ आश्रम मध्ये जाऊन वस्त्र वाटप करत खाऊ वाटप करत आपल्या वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा केला याच निमित्ताने त्यांनी मतदार जागृती व नोंदणी शिबिर आयोजित केलं होतं व संध्याकाळी सगळ्यांसाठी महाप्रसाद भंडारा आयोजित करून आपला सामाजिक रित्या वाढदिवस साजरा केला.
त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनंत चतुर्दशीच्या दिवशी सप्तरंग सेवाभावी संस्था नांदेड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड व फ्लालेज फीमेल्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी जनजागृती मोहीम मी ही मानव हा नवीन उपक्रम ची सुरुवात या दिवशी करण्यात आली या अंतर्गत तृतीयपंथी देखील मानव आहेत व समाजाचा हिस्सा आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी त्यांचा स्वीकार करावा हा संदेश देण्यासाठी त्यांनीही मोहीम अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री च्या आशीर्वादाने सुरुवात केली. या संकल्पनेचा नांदेडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्वांनी तृतीय पंथ यांना पैसे न देता फक्त त्यांचा आशीर्वाद घेतला व आपणही मानव आहोत आणि आपल्या समाजाचे हिस्से आहोत हे दाखवून दिलं व त्यांच्यासोबत फोटो काढत त्यांना एका प्रकारे मानवंदना दिली.
नवोदित युवक युवतींसाठी ज्यांना अठरा वर्षे पूर्ण झाल्या त्यांच्यासाठी मतदाता होण्यासाठी मार्गदर्शन शिबिर देखील संतकृपा मार्केट बाहेर एक पेंडॉल लावून आयोजित करण्यात आलं होतं या माध्यमाने विविध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला व जवळपास 100 विद्यार्थ्यांनी विचारणा करत याची माहिती घेऊन आपण लवकरच मतदाता होऊन हे आश्वासन देखील दिले आणि आपण खात्रीने त्यांचे नंबर घेऊन त्यांचे मतदाता म्हणून नोंदणी झाली असल्याचे खात्री करून घेण्याचे प्राण जेठवाणी यांनी घेतले निवडणूक दूध म्हणून मतदाता यादी आणि मतदाता वंचित राहू नये यासाठी कार्य करत आहेत आणि करत राहणार पुढच्या वर्षी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे.
आणि तोपर्यंत आपण जास्तीत जास्त मतदाता तयार करायचे आहेत आणि मतदातांना जागृत करून मतदान साठी तयार करायचा आहे हे पण देखील त्यांनी घेतलं व अनेक मोहीम अशा पद्धतीने राबवण्याचे कार्य माझ्या संस्थेच्या वतीने व स्वतः माझ्याकडून सुरू राहील अशी ग्वाही दिली. सदरील मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांच्यासोबत श्री हरीश काळे सिद्धार्थ भोले विजय पवार सौ अमरजीत कौर कुमारी सेजल कृपलानी या सर्वांनी मदत केली.
