श्रीरामभक्त डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने श्री क्षेत्र काळेश्वर येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठाण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व महाप्रसाद

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नवीन नांदेड| श्रीरामभक्त डॉ .संतुकराव हंबर्डे यांच्या वतीने श्री क्षेत्र काळेश्वर येथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठाण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण व महाप्रसादाचे आयोजन आज करण्यात आले होते.

अखंड हिंदुस्थानचे आराध्य प्रभू श्रीराम आज अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले. ५०० वर्षांहून अधिकची प्रतीक्षा समाप्त झाली. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते अयोध्येत पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा ऐतिहासीक सुवर्णक्षणाचे औचित्य साधून अयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण नांदेडकरांच श्रध्दास्थान श्री काळेश्वर मंदीर देवस्थान विष्णुपुरी येथे मोठ्या स्क्रीनद्वारे करण्यात आले.

सदर सोहळा हजारोंच्या संख्येने उपस्थित रामभक्त हिंदु बांधवांनी “याची देही याची डोळा” अनुभवला तद्नंतर प्रभु श्रीरामचंद्रांचे भजन व महाआरती करण्यात आली. उपस्थित सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले याचा विष्णुपुरी व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. सप्तनिक व सहपरिवार या सोहळ्यात रामभक्तांची सेवा करण्याची मला संधी प्राप्त झाली. याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो असे उद्गार यावेळी डॉ. हंबर्डे यांनी काढले. यावेळी चैतन्य बापू देशमुख रविकिरण पोतदार डॉ. शितल भालके शततारका पांढरे महादेवी मठपती धारोजीराव हंबर्डे शंकरराव हंबर्डे बालाजीराव हंबर्डे आदिन सह विष्णुपुरी परिसरातील हजारो भाविक भक्तांनी हजेरी लावली.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!