नांदेड| शहरात व जिल्हयात अवैधरीत्या शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांवर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पोलीस निरीक्षक, व्दारकादास चिखलीकर यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी अवैध शस्त्र विक्री करणारे व बाळगणाऱ्यांची माहिती काढून आरोपीस अटक करण्यासाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
दिनांक 27/10/2023 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, नगीनाघाट परिसरात एक इसम तलवारी व खंजीर त्याचे किरकोळ राहित्य विक्रीचे गाडयाचे खाली लपवून ठेवून ग्राहक आल्यास विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती.
सदर माहिती मिळालेल्या माहितीच्या आधारे नगीनाघाट परिसरात जावून छापा मारला असता सदर इसम नामे दर्शनसिंघ लाभसिंघ, वय 35 वर्ष, व्यवसाय व्यापार, रा. बंगीकला ता. तलवंडी साबोली) जि. भींडा राज्य पंजाब याचे गाडयातून 21 तलवारी व 11 खंजीर असाएकूण 36,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर ताब्यातील इसमास पुढील तपासकामी पो.स्टे. वजिराबाद यांचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नादेड, अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली व्दारकादास चिखलीकर, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि रवि बाहुळे, सपोनि पांडूरंग माने, सपोउपनि माधव केंद्रे, पोहेकॉ / गंगाधर कदम, पोहेकॉ सुरेश घुगे, पोहेकॉ / अफजल पठाण, पाहेकॉ बालाजी तेलंग, पोना/दिपक पवार, पोना / संजिव जिंकलवाड, पोकों/ तानाजी येळगे, पोकॉ/ रणधिरसिंह राजबन्सी, पोकों/विलास कदम, पोकॉ/ गजानन वयनवाड, मपोकॉ/ किरण बाबर, चापोकों / गंगाधर घुगे व चापोकों / हनुमानसिंह ठाकूर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.