मनपा सिडको मातृ आरोग्य सेवा केंद्र अंतर्गत २२ ठिकाणी पल्स पोलीऒ लसीकरण, ८० टक्के उदिष्ट

नवीन नांदेडl नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको मातृ सेवा आरोग्य केंद्र अंतर्गत २२ ठिकाणी पल्स पोलीऒ लसीकरण ० ते ५ वयोगटातील बालकांना ३ मार्च रोजी करण्यात आले यावेळी एकुण ८९८० बालंका पैकी ७१४६ लसीकरण करून ८०टक्के उदिष्ट साकारण्यात आले यासाठी वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक कर्मचारी, आशा वरकर, परिचारिका, अंगणवाडी मदतनीस यांच्या सह मलेरिया विभागातील कर्मचारी, स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.
३ मार्च रोजी नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको मातृ आरोग्य केंद्र यांच्या अंतर्गत २२ केंद्रावर ० ते ५ वयोगटातील एकुण ८९८० बालकांना पल्स पोलीऒ लसीकरण मोहीम अंतर्गत उदिष्ट देण्यात आले होते, यावेळी प्रत्येक केंद्रावर तिन कर्मचारी यांच्या सहायाने तर ४ ट्रान्झिसटर बुथ लातूर फाटा येथे व एक फिरते पथक मार्फत लसीकरण करण्यात आले.
यावेळी डॉ.संतोष शिंदे, डॉ.शमी यांच्या सह सहाय्यक गलपवाड राजकुमार, वडमिले, ऋषीकेश सोनवणे, भरत मुंढे,लोखंडे, परिचारिका नसरीन पिंजारी, मिनाक्षी शिंदे,वैशाली वाघमारे,दरगावे,व २२ केंद्रावरील ८० कर्मचारी यांनी लसीकरण मोहीमेत सहभाग नोंदविला. हि मोहीम सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत राबविण्यात आली यावेळी ७१४६ बालकांना लसीकरण करण्यात आले. दिलेले उदिष्ट पैकी ७१४६ बालकांना लसीकरण देऊन ८० टक्के उदिष्ट साध्य करण्यात आले.
