नांदेडमध्ये 1.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के- घाबरलेल्या नागरिक घराबाहेर पडले होते

नांदेड। शहरातील महापालिका हद्दीतील काही भागात रविवारी दि. 3 सायंकाळी 6.19 वाजताच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. भूकंपाच्या धक्क्याने घरे हादरल्याने नागरिकांत घाबरहट निर्माण झाली होती. भूकंपाचे धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्राथमिक अहवालानुसार 1.5 रिश्टर स्केल इतकी तीव्रता भूकंपाची असल्याचे सांगितले गेले आहे.
नांदेड शहरातील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर, शिवाजीनगर, पोलीस कॉलनी आदी भागात आज जमिनीतून गूढ आवाजासह भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. यापूर्वीही नांदेड शहरात अशा प्रकारचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळी सायन्स कॉलेज परिसरात केंद्र बिंदू असल्याचे सांगण्यात आले होते. आजच्या भूकंपा बाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या धक्क्याची नोंद 1.5 रिश्टर स्केल इतकी असल्याचे सांगण्यात आले.
स्वाराति विद्यापीठातील भूकंप मापण यंत्रणेच्या प्राथमिक अंदाजानुसार उत्तर नांदेड शहरातील गणेश नगर, विजयनगर, पावडेवाडी परिसरात सायंकाळी 6:19 वाजता 1.5 रिश्टर स्केल चा अति सौम्य भुकंपाचा धक्का शहराला बसला आहे. स्वाराति विद्यापीठातील भूकंप विभागाचे डॉ. श्री विजयकुमार अद्याप यावर काम करत आहेत. अशी माहिती श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
