आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था शाखा बेंद्री ता.भोकर येथे नामफलकाचे अनावरण नियुक्तीपत्र वितरण सोहळा

भोकर। भोकर तालुक्यातील बेंद्री ता. भोकर येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य नामफलकाचे अनावरण व तालुक्यातील अनेक शाखा, कार्यकारिणीची निवड व नियुक्तीपत्र वितरण सोहळा दि.२९ डिसे.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात,टाळ मृदंग आणि पताके घेऊन मिरवणूकित फुलांची ऊदळण करीत नामघोषेत नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले.
हभप गुरूवर्य राम महाराज पांगरगेकर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुक करून सभेच्या ठिकाणी पोहचली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन संस्थेचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे, श्रीरामजी पाटील शिंदे, व्यंकटराव पाटील कपाटे, श्री दत्तराम पाटील एडके,सल्लागार श्री शिवाजी पांगरेकर,श्री बालाजी पा.जाधव, उपाध्यक्ष -गंगाधर हंबर्डे,सचिव -व्यंकटराव माळकौठेकर, सहसचिव -प्रभाकर पा. पुयड कोषाध्यक्ष -शिवाजी मदमवाड वडगावकर संस्थेचे सदस्य – श्री प्रवीण पार्डीकर,श्री गुलाबराव पा.उबाळे,श्री हरिनाम पा.कदम,श्री संतोष पा.कदम,श्री भगवान पा.रहाटीकर ,श्री त्रिमुख पा.येडके, जिल्हाप्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाकोरे पाटील,जिल्हा प्रसिद्धी उपप्रमुख अशोक वाघमारे ,जिल्हा प्रसिद्धी कोष्यध्यक्ष रामप्रसाद चन्नावार तालुका प्रसिद्धी प्रमुख गजानन चौधरी, उमरी तालुका प्रसिद्धी प्रमुख शिवराज होनशेट्टे उमरी तालुका सहसचिव किशोर पडोळे, जिल्हा मल्टिमिडीया अध्यक्ष -गणेश पवार भोकर तालुका अध्यक्ष शंकर पा.देवकते, उपाध्यक्ष पांडुरंग मांजरे,सचिव- रमेश नारलावार व बेंद्री येथील भोकर तालुका अध्यक्ष शंकर देवकत्ते व बेंद्री शाखा अध्यक्ष कैलास बबीलवाड व तसेच सर्व शाखा पदाधिकारी.. नायगाव तालुका अध्यक्ष सोपान पा.गिरे,मुदखेड तालुका सचिव बालाजी पवार, हदगाव तालुका अध्यक्ष माधवराव बोईनवाड, धर्माबाद तालुका अध्यक्ष विठ्ठल धारजने , हिमायतनगर तालुका अध्यक्ष नागोराव मेंडेवाड ऊपस्थित होते.
प्रथम दिपप्रज्वलन करुन साधुसंत, प्रमुख मान्यवराचे शाल श्रीफळने सत्कार करण्यात आला. संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष गुरुवर्य ह.भ. प. श्री राम महाराज पांगरेकर यांच्या शुभहस्ते भोकर तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारीणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्यंकटराव पा. पुय्यड यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रभाकर महाराज पुय्यड,चंपतराव डाकोरे, शिवाजीराव पांगरेकर ,ईत्यादीने आपले धार्मिक कार्याबदल माहिती दिली. संस्थापक अध्यक्ष हभप प.पुज्य गुरूवर्य श्रीराम महाराज पांगरेकर यांच्या रसाळ ज्ञानामृत वाणीतून आम्ही वारकरी परिवार ही संकल्पना स्पष्टपणे मांडली.
त्यांनी त्यांच्या मनोगतात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करताना फक्त बेचाळीस साधकांना घेऊन सुरू केले ते सहा वर्षांत सहा हजार सातशे पन्नास साधक जोडले गेले तर येणाऱ्या श्रावण महिन्यात जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओवा तेवढे साधक करण्याचा संकल्प केला तसेच पंढरपूर येथे आम्ही वारकरी परिवाराची धर्मशाळेबद्दल माहिती या कार्यक्रमात दिली…सर्व भाविक भक्तांनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करून घेण्यासाठी संतसंग हाच खरा मार्ग आहे..जीवनामध्ये धार्मिक कार्य करण्यासाठी ज्ञानभक्तीची वृध्दी करून जीवन सुखकर करण्यासाठी भक्तिमार्ग फार महत्त्वाचा आहे.
धार्मिक वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन करून दुषित वातावरण शुध्दीकरण करण्यासाठी आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेत सहभागी होण्याचे अव्हाहन केले. बोर्ड अनावरण मेळ्याव्याच्या प्रसंगी हरिकृपा भजनी मंडळ बरबडा व आनंद दत्त भजनी मंडळ आलेगाव या दोन भजनी मंडळाचा कार्यक्रमही संपन्न झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील व तालुक्यातील शाखेतील सर्व आघाडी मुख्य आघाडी, प्रसिद्धी आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, साधुसंत,भाविक भक्त मंडळी हजारोंच्या संख्येनी भक्ततानी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वितेसाठी ता भोकर तालुका अध्यक्ष शंकर देवकते,पांडुरंग मांजरे,रमेश नारलावाड,रामदास सिनगारे, गजानन पाटिल शाखा प्रमुख केलास बबिलवाड, शा. ऊपप्रमुख बालाजी बचलवाड, हहनमंतउ तोटेवाड,गणेश रामशेटवाड,ज्ञानेश्वर खंडरवाड, गजानन खाडरे,लक्ष्मण बोईनवाड,चंद्रकांत बोडके, ईत्यादीने परीश्रम घेतले अशी प्रसिध्दीपत्रक जिल्हा प्रसिध्दिप्रमुख चंपतराव डाक़ोरे पाटिल रामप्रसाद चन्नावार यांनी दिली.
