किनवट/शिवणी, प्रकाश कार्लेवाड। वनपरिक्षेत्र विभाग किनवट अंतर्गत विभागीय व्यवस्थापक जे.डी.पराड.सहाय्यक व्यवस्थापक के.एन.यादव यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट तालुक्यातील शिवणी केंद्रीय प्रा.शाळा व हायस्कूल येथे दि.०४ ऑक्टोबर बुधवार रोजी वन्य जीव सप्ताह कार्यक्रम वन विकास महामंडळ शिवणी वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस.पटवेकर यांच्या उपस्थित संपन्न झाले.

या वेळी विध्यार्थ्यांना वन्यजीव व वृक्षलागवड, पर्यावरण या संबधी माहिती देतांना वनपरिक्षेत्र अधिकारी जि.एस.पटवेकर म्हणाले की,वनांचे व वन्यजीवांचे रक्षण करणे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे असे मत व्यक्त केले. या वेळी कार्यक्रमात प्रा.के.शाळेचे व माध्यमिक शाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थी वन विकास महामंडळाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.* १ ते ७ ऑक्टोबर दरम्यानचा ऑक्टोबर महिन्यातील पूर्ण आठवडा हा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो.यात प्रामुख्याने निसर्गामध्ये वन्यजीवांचे अस्तित्व टिकून रहावे म्हणून वन्यजीवांचे रक्षण करणे प्रत्येक मानव जातीचे आद्यकर्तव्य आहे.

अलीकडच्या काळात वन्यप्राणी यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.त्यामुळे ही कमी होत चाललेली संख्या वाढवायची आहे. तरच या निसर्गात समतोल साधला जाईल. दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो. पण ती झाडे आपण जगवली पाहिजेत. त्यांचे संरक्षण केले पाहिजे. तरच पाऊस जास्त प्रमाणात पडेल व जमिनीची धूप थांबेल. म्हणुन आजचे जीवनमान चांगल्याप्रकारे टिकवण्यासाठी, निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार महत्त्वाचा आहे. म्हणूनच वनांचे वन्यजीवांचे रक्षण करणे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य असे म्हणत वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जि. एस.पटवेकर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मत व्यक्त केले.

यावेळी वनपाल बी.डी. डवरे, एच.पी.नागरगोजे, बी.एस.केंद्रे, वनरक्षक बी.एम. वडजे,सी.पी.गडलिंग,एस.एम सोमासे, डी.एम.मिसे, प्रार्थमिक शाळेचे मुख्याध्यापक जे.बी.मलगे, डॉ.कविता फोले,जी.जी.तरटे,बी.पी.कांबळे, एस.एस.गवळी, माध्यमिक शाळेचे जि.एस.गोपुवार, एस.व्ही.डहाळे,आर.जी बोरागावे,सहशिक्षिका हिना इनामदार,एम.आर.गिरी सह पालक वर्ग विध्यार्थी आदी. उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचलन गवळी यांनी केले तर आभार डवरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीते साठी वन कर्मचारी वन मजूर आदींनी परिश्रम घेतले.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version