नवीन नांदेडl स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना व उद्यान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १ ते ७ जुलै वन महोत्सवानिमित्त विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. एम.के. पाटील यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरामध्ये अत्यंत दुर्मिळ व औषधीसाठी उपयुक्त असणारे दोन पानांच्या ‘पळस’ चे वृक्षारोपण करण्यात आले.

दोन पानांचे औषधी पळस रोप हे किनवट भागातुन किनवट येथील कै. उत्तमराव राठोड आदिवाशी विकास व संशोधन केंद्राचे संचालक डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्यामार्फत विद्यापीठात उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. शशिकांत ढवळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, उपकुलसचिव डॉ. रवि सरोदे, हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सहाय्यक कुलसचिव रामदास पेदेवाड, डॉ. लक्ष्मीकांत आगलावे, सिस्टीम एक्सपर्ट शिवलिंग पाटील, सुनील जाधव, सुधाकर शिंदे, हरीश पाटील, शिवाजी कल्याणकर, पांडुरंग सूर्यवंशी, संभाजी धनमने, अजमेर बिडला तसेच संकुलातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version