लाईफस्टाईललातूर

पालकांनो खबरदार;बालकांना वाहन द्याल तर “सासरवाडी” (जेल) मध्ये जाल

हंडरगुळी/उदगीर/लातूर,विठ्ठल पाटील। मिसरुडं न फुटलेल्या पोरांनी कोणतेही वाहन चालवले,तर त्यांना 100 ₹.दंडाची तरतुद होती.त्यानंतर ,या दंडात पाच पट वाढ करुन 500 ₹.झाली.शहरी भागात वाहतूक पोलिसांनी पकडले तर दंड भरुन चालक=मालक मंडळी निश्चित व्हायचे.माञ हंडरगुळी.ता. उदगीर येथे आजवर कुणी पण अशा ना-बालक असलेल्या चालकांवर कारवाई केली नाही. म्हणुन तर येथे मेन रोड सह गल्लोगल्ली ना-बालक सुसाट वेगात व फटाका हाॅर्न वाजवत स्वत:च्या ताब्यातील गाडी पळवतात.

कारण मिसुरड ही न फुटलेल्या बालकांमुळे अपघात होऊ शकतो.व अशा बालकांना सं. पालकवर्ग सुध्दा मनाई करण्याऐवजी मोठ्या रुबाबात गाडी चालवायची परवानगी देतात. पण आता पालकांनो खबरदार ….! कारण आता मोटार वाहन कायद्यात मोठा बदल झाला असुन,या बदला नुसार कारवाई झाली तर संबंधित चालक (बालक) मंडळींवर रितसर कारवाई तर होणारच.याच बरोबर सं. पालकांना जेल (सासरवाडी) ची हवा खावी लागणार आहे.तेंव्हा पालकांनो वेळीच सावध व्हावा,आणि आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात घालू नका.

मोटार वाहन अधिनियम सुधारणा २०१९ अंतर्गत होम,परिवहन विभाग, मुंबईच्या वतीने वाहनचालकांवरील नव्या दंडाची,कारवाईची निर्धारणा केली असुन,सं.आदेशान्वये वय वर्षे सोळाच्या आतील बालकांना (मुले – मुली) वाहन चालविताना आढळले तर ₹ 5 हजार दंड होणार आहे.. तसेच आपल्या अल्पवयीन लेकरांना मोठ्या रुबाबात गाडी चालवायची मुभा,सुट देऊन बालकांचे फ्यूचर धोक्यात घालणा-या पालकांना पण नविन नियमांनुसार कारवाईस सामोरे जावे लागणार.प्रसंगी जेल (ससुराल) ची हवा पालकांना खावी लागणार. व या सगळ्या झंझाटापासुन सुटका हवी असेल तर सुजाण पालकांनी आपल्या पाल्यांचे भविष्य वाहन देऊन बरबाद करु नये, बाईक रेसर्सवर कारवाई करावी. 

येथे शेकडो बालके ज्यांना मिसरुडंही फुटले नाही.असे पोरं लहान-मोठी वाहने सुसाट व फटाका हाॅर्न वाजवत चालवतात.याबद्दल धुम स्टाईल गाड्या चालवू नका.असे म्हणा-या पित्यासमान व्यक्तींनाच उलट-सुलट कांही बाईकस्वार बोलतात.म्हणे. तसेच विनाकारण गल्लीबोळात व शाळा,काॅलेज रोडवर फटाका हाॅर्न वाजवत ना-बालकांसह कांही सज्ञान पोरं पण धुम स्टाईल गाड्या चालवत असुन,सपोनी.भिमराव गायकवाड, उपनी.एम.के.गायकवाड, जमादार. संजय दळवे हे जसे अवैध धंद्यावर गत कांही दिवसात धडाकेबाज कारवाई करताना दिसतात.तशी कारवाई अशा चालकांसह त्यांच्या प्रिय पालकांवर ही कारवाई करावी, अशी रास्त मागणी अशा वाहनांमुळे व चालकांमुळे ञस्त झालेली सामान्य जनता व शाळा,काॅलेज स्टूड्सं मधून होत आहे.व कारवाई करा हो…असा टाहो ञस्त आमआदमी फोडत आहेत तसेच कारवाईकडे समस्त जाणकार व ञस्त हाळी-हंडरगुळीकरांचे लक्ष लागले आहे….

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!