पोलीस अधिक्षक कार्यालयात “आंतरराष्ट्रीय धोके निवारण्याची शपथ घेण्यात आली

नांदेड। 13 ऑक्टोबर 2023 रोजी शुक्रवार या दिवशी “आंतरराष्ट्रीय धोके निवारण्याची शपथ पोलीस अधिक्षक कार्यालयात घेण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकामध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने 13 ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिवस म्हणुन घोषीत केला आहे.
त्या अनुषंगाने मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक्षक कार्यालयात शपथ घेण्यात आली. मा. श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस उप अधिक्षक (मु) नांदेड यांनी सदर शपथेचे सामुहीक वाचन केले. या प्रसंगी मा. श्री. नामदेव रिठठे, पोनि पोलीस कल्याण मा. श्री. कन्हाळे, पोनि एटीसी, श्री शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, श्री पांडुरंग माने, सपोनि स्थागुशा यांचे सह पोलीस अधिक्षक कार्यालयातील सर्व विभागाचे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर शपथ कार्यक्रमाचे आयोजन, सपोउपनि श्री सुर्यमान कांगणे, पोकॉ मारोती कांबळे, मपोकॉ / कांचन शिंदे यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.
