खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नाने दोन रुग्णांच्या उपचारासाठी सहा लाखाचा निधी मंजूर
हिमायतनगर,परमेश्वर काळे| हिमायतनगर शहरातील एका महिलेस व तालुक्यातील सरसम (बु.) येथील व्यक्तीस दूर्धर आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार हेमंत पाटील यांच्याशी संपर्क साधत आरोग्य सेवेसाठी मदत मागीतली होती. त्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनी दोन्ही रुग्णांवर योग्यवेळी योग्य उपचार व्हावेत यासाठी पंतप्रधान कार्यालयात लेखी पत्र दिल्याने सदरील रूग्णास प्रत्येकी ३ लाख रुपये अशी एकुण सहा लाख रुपयाची आरोग्य उपचारासाठी आर्थिक मदत मंजुर झाली आहे.
हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिव सैनिकांना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण असा गुरुमंत्र दिला. खासदार हेमंत पाटील मागील अनेक वर्षापासून विविध माध्यमातून राजकारणा सोबतच समाजसेवा करत गरजवंत रुग्णांची सेवा करून बाळासाहेबांनी दिलेली शिकवण पुढे घेऊन जाण्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहेत.
शहरातील नसीम बी जुम्मा खान पठाण महिलेस, व सरसम बु. येथिल तुकाराम सुर्यवंशी यांना दूर्धर आजाराची लागण झाल्याचे निदान झाले. सुरुवातीस नातेवाईकांनी त्यांच्या उपचारासाठी कर्ज काढुन उपचार केले. परंतु दिवसें दिवस या आजारावर होणारा खर्च वाढतच जात होता. अशा कर्जबाजारी झालेल्या कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांची भेट घेतली. घरची हलाखीची परस्थिती पाहुन खासदार हेमंत पाटील यांनी तात्काळ पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क केला. सदरील व्यक्तींच्या उपचारासाठी शक्य तेवढी मदत दिली जावी अशी पत्राद्वारे मागणी केली.
खासदार हेमंत पाटील यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली मागणी आणि सदर कुटूंबाची हलाखीची परिस्थिती पाहता पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने उपरोक्त दोघांच्याही उपचारा करीता प्रत्येकी ३ लाख अशी ६ लाख रुपये इतकी रक्कम मंजुर केली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील युनायटेड सिग्मा इंस्टिट्युट मध्ये नसीम बी पठाण आणि कमलनयन बजाज रुग्णालयात तुकाराम सुर्यवंशी यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात येत असून, अडचनीत सापडलेल्या दोन्ही कुटुंबियांनी, वेळेवर केलेल्या मदती बद्दल खासदार हेमंत पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.