नांदेड| महाराष्ट्रात व देशात भाजपा सरकार आहे व मि सदैव शेतकऱ्यांच्या आडी-आडचणी व समस्या सोडविण्यासाठी आहे आणि या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे प्रतिपादन खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी नांदेड जिल्ह्यातील प्रमुख मुखेड-देगलूर येथील लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण भेट दिली त्यानंतर ते बोलत होते.
लेंडी प्रकल्पाच्या गेल्या 38 वर्षापासून रखडलेल्या लेंडी आंतरराज्य संयुक्त प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्या मान्य कराव्यात म्हणून जवळच्या 12 गावतील शेतकरी साखळी उपोषणास बसले आहेत.आज या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्यांच्या सर्व अडाचणी समजून घेऊन निवेदन स्विकारून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रंजी फडणवीस यांच्या कडे जाऊन सदरिल प्रश्नावर त्वरित उपाययोजना करुन शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी मी येथे आलो आसल्याचे सांगितले.
यावेळी जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता दाभाडे साहेब, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती देवकुळे मँडम.उपजिल्हाधिकारी सचिन गिरी.उपविभागिय पोलिस अधिकारी देशमुख साहेब, कार्यकारी अभियंता तिडके साहेब.महावितरण कार्यकारी अभियंता चाटलावार साहेब.भाजपाचे व्यंकटराव पा.गोजेगांवकर., मा.आ. सुभाषराव साबणे.शेतकरी संघटनेचे गुणंवतराव पाटील हांगरगेकर. बालाजी बच्चेवार.शिवाजीराव कनंकटे.व्यकंटराव गुजरीकर.राजू पा.रावणगांवकर.सुरेश सावकार.श्रीनिवास पाटील.सचिन पाटील, डाँ.सुनिल देशमुख.संभाय्या आप्पा.निळकंठ पाटील.राजू पा.जाधव व उपोषण ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.