
हंडरगुळी/ उदगीर/लातूर,विठ्ठल पाटील| १०० मिटरच्या आत बिडी,काडी,तोटा व गुटखा विक्रीस बंदी असतानाही हंडरगुळी ता.उदगीर येथील जि.प.कें.प्रा.शाळे लगतच गुटखा विक्रेत्यांनी धुमाकुळ माजवला आहे.तरी ही याकडे पं.स.व जि.प.प्रा. शिक्षणाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासन अधिकारी दुर्लक्ष का ? करत आहेत.पाॅकेट मिळते म्हणुन का ? असे प्रश्न पालकांसह जाणकार जनते मधून चर्चीला जात आहे.
बरं हे गोरख धंदे सरकारी जागेवर अतिक्रमण करुन राजरोसपणे चालताना सामान्य जनतेला दिसत आहे.माञ संबंधित अधिका-यांना दिसत नाही.यामागचा “अर्थ”काय.तसेच शाळेच्याच सुरक्षा भिंतीला खेटून बंदी असलेला बाबा, रत्ना- ३००/ १२० आरएमडी, नजर , रजनिगंधा यासह विमल,गोल्ड नावचे गुटखा व मटेरियल खुल्लमखुल्ला विकत असल्याचे दिसते.आणि कांही गुरुजी शिष्यालाच गुटखा आणायला टपरीवर पाठवतात.असे बोलले जाते. तसेच नावालाच गुटखा बंदी आहे. कारण अन्न व औषध प्रशासन FDA अधिकारी स्वत:ची आर्थीक चांदी करुन घेतो.
आणि गुटखा विक्रेत्यांकडे जाणुन-बुजून दुर्लक्ष करतो.म्हणुनच सध्या शाळेच्या कंपाऊॅंड भिंती लगत गुटखा विकणारे उद्या डायरेक्ट शाळे मध्ये विकणार नाहीत.याची गॅरंटी FDA व शिक्षण खाते देईल का? शासनाच्या जागेवर अतिक्रमण करुन तसेच १०० मिटरच्या आत विक्रीस कायद्याने बंदी असतानाही जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळे लगत गुटखा कुणाच्या आर्शिवादाने विकला जातोय.संबंधित अधिकारी झालेत कमजोर;म्हणुनच शाळेच्या आवारा जवळच गुटखा विक्रीला आला जोर.. तरी यामुळे बालमनांवर परिणाम होऊ शकतो.तेंव्हा याकडे लक्ष देऊन कारवाही करायची डेअरींग शिक्षण खाते दाखविणार.का ? अन्न-औषध FDA खाते.याकडे जनतेचे लक्ष आहे
