
वडगाव /पोटा, पांडुरंग मिराशे। हिमायतनगर तालुक्यातील बळीराम तांडा येथील रहिवासी असलेले ऊस तोडणी तरुण कामगार अर्जुन भगवान घोटकर वय वर्ष 22 हा दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता खैरगाव येथील उसाच्या फडात ऊस तोडीत असताना त्यांच्या पायाला पाठीमागून विषारी सापाने चावा घेतल्याने त्याला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारास पाठवले असताना उपचार दरम्यान दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचे निधन झाले तरुण कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबासह गावावर शोककळा पसरली आहे.
श्री सुभाष शुगर प्रा लिमिटेड हडसणी यांच्यामार्फत ऊस उत्पादक शेतकरी श्री दिलीप गंगाराम काटे राहणार खैरगाव तालुका हिमायतनगर यांच्या उसाची ऊसतोड चालू असते वेळेस दिनांक 21 फेब्रुवारी रोज सकाळी दहा वाजता दरम्यान ऊस तोडणी तरुण मजूर अर्जुन भगवान घोटकर अंदाजे वय 22 वर्ष राहणार बळीराम तांडा तालुका हिमायतनगर या तरुण कामगारांचा उजव्या पायाला ऊसाच्या फडात ऊसतोड करीत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने त्याला तातडीने नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान दिनांक 27 फेब्रुवार रोज मंगळवारी सकाळी निधन झाले.
कुटुंबातील करता मुलगा मरण पावल्याने आई वडील व भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. वाहतूक ठेकेदार ओंकार देवराव जाधव यांचा तो ऊसतोड मजूर आहे. त्यांच्या पार्थिवावर मौज बळीराम तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
