
हिमायतनगर। राष्ट्रीय महामार्ग व ग्रामीण रस्त्यावर वाट मारी करूण लूटमार करणार्यां दोघां जनांना सिने स्टाईल पाठलाग करून पोलीसांनी जेरबंद केले असून मोबाईल सह नगदी रक्कम असा ऐवज जप्त केला आहे.
हिमायतनगर पोलीस ठाण्या अंतर्गत दि. १८ रोजी वाटमारी करून फिर्यादीकडून पैसे व मोबाईल लूटले होते. प्राप्त तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्याचप्रमाणे, दि. १ रोजी मोटारसायकल अडवून, चाकूचा धाक दाखवून नगदी रक्कम व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. अश्या प्रकारे वाटमारीचे दोन गुन्हे हिमायतनगर पोलिसात दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्य़ातील आरोपीचा शोध सुरू होता.
दरम्यान गोपनीय माहीतीच्या अधारे मुदखेड येथून मोठ्या शिताफीने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना विश्वासात घेऊन अधिकची केली असता, आरोपींनी गुन्ह्याची कबूली त्यांनी दिली. या गुन्ह्यांमध्ये एकूण ४ आरोपी आहेत. या गुन्ह्य़ातील तिन रिअलमी कंपनीचे तिन मोबाईल व नगदी रक्कम ३ हजार आठशे रूपये रिकव्हर करण्यात आले आहेत. हि कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक निता कदम, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोमल कागणे, पो. काॅ. श्याम नागरगोजे पो. काॅ. पाटील, पो. काॅ. चौदंते, महिला पोलीस शिपाई पवार यांनी केली आहे. पोलिसांच्या या उल्लेखनीय कारवाई चे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
