नांदेड वैद्यकीय महाविद्यालयात जे मृत्यूकांड झाले ते अत्यंत दुर्दैवी, धक्कादायक, क्लेशदायक तथा कुणाचेही हृदय पिळवटून टाकणारेच होते यात काही शंकाच नाही.! यात गफलत झाली ती शांतपणे समजून घेण्याची. चूक कुणाची आणि शिक्षा कुणाला? या बाबीची! माझ्या मते चूक ही व्यवस्थेची आहे.
स्थानिक नेत्यांनीं तात्काळ दखल घ्यायला हवी व काही नेत्यांनी अत्यंत तत्परतेने घेतली, मार्गदर्शन केले व मदतही केली. काहींनी घटणेबद्दल चिड तथा रोषही व्यक्त केला. हेही साहजिकच होते. काही नेते मंडळी बाहेरून येऊन वेड्या वाकड्या प्रतिक्रिया देऊन आपल्या बालबुद्बीचेच प्रदर्शन करत आहेत. अर्थात वैद्यकीय क्षेत्राशी काही एक गंध नसलेली ही मंडळी आहेत. केवळ राजकिय दृष्टीकोण समोर ठेऊन! त्यातच मिडियावर हे हॉस्पिटल प्रशासन कसे कुच कामी आहे. शासन-प्रशासनच त्याला कसे जबाबदार आहे इ. या सर्व बाबींची चर्चा मिडीयावर वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित नसलेल्या व्यक्तींची चर्चा घडवून आणत आहेत.! डॉक्टर प्राण वाचविण्याची शिकस्त करतात. डॉक्टर रोगाचा उपचार करतात. मृत्यू स्व स्वकीयाचाच नाही तर स्वतःचाही रोकू शकत नाहीत हे सूर्य प्रकाशा एवढे सत्य आहे.! त्यांची व त्या रूग्णालयाची किती म्हणून बदनामी करायची? त्यामुळे गोर-गरिब जनता अक्षरशः होरपळून निघत आहे. जनता भयभित झालेली आहे. खाजगीत जायला पैसा नाही म्हणून घरीच मृत्यूमुखी पडत असलेल्या रूग्णांच्या मृत्यूचा आकडा रूग्णालयात मृत्यूमुखी पडत असलेल्यांची कदाचित खूप मोठा असू शकतो. रोज मृत्यूमुखी पडण्या जोगे रूग्ण वाचून आनंदाने घरी किती गेले त्यांची संख्या पहावला हवी.
म्हणून म्हणावेसे वाटते, आता बस्स झालं. लोक नेत्यांनों आता तरी डॉ.शंकररावजी चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला रूग्णालयातील गरीब, गरजू, गंभीर रूग्णांची काळजी घेऊ द्या.! आमचे स्थानिक लोक प्रतिनिधी आमच्या नांदेडच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत.
बस्स झाल आता.! कुणीही या संदर्भात नांदेड दौरा काढू नका!
नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय हे एक बर्यापैकी नावाजलेल्या वैद्यकीय महाविद्यालयां पैकी एक महाविद्यालय आहे. महाविद्यायात वैद्यकीय शिक्षणासाठी होतकरू विद्यार्थी विद्यार्थीनीं परप्रांतातून स्वेच्छेने व पंसतीनी ईथे चांगले शिक्षण मिळते ,ईथे भरपूर रूग्ण येतात, गंभीर आजार दुरूस्त करण्याचा अनुभव मिळतो, शिक्षण मिळते म्हणून प्रवेश घेतात. प्रतिवर्षी शंभर विद्यार्थी भरती होतात. जवळ जवळ तेवढीच एम.बी.बी.एस. डॉक्टर्स होऊन बाहेर पडतात. त्यातील किमान पंचविस डॉक्टर्स दरवर्षी पद्वित्तर शिक्षण घेऊन विशेष तज्ञ डाक्टर्स होतात. ही सर्व मंडळी रूग्णाच्या तपासणी आणि उपचार सेवेसाठी सहज उपलब्ध होतात. तसेच नर्सिंग सेवेचीही उपलब्धी होते. रूग्ण सेवेची नड तथा गरज भागते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास येणारा सर्व रूग्ण ओंढा म्हणजे गोर गरिब, अंःधश्रद्धा, अशिक्षित, आडलेले, नडलेले, उशीरा दवाखाण्यास निघालेले असतात. ते तातडीच्या विभातून भरती होणारे, खाजगी रूग्णालयाकडून पाठविलेले अत्यावस्थेत तथा गंभीर स्वरूपांचे रूग्ण असतात. हे रूग्ण खाजगीत खूप खर्चा करून आलेले तथा खिसा रिकामा करून हातघाईला आलेल्या अवस्थेत असतात. आता आम्ही खाजगीत खर्चा करू शकत नाही असे म्हटल्यानंतर व शेवटचे क्षण मोजत असलेले रूग्णच ईकडे पाठविलेले असतात.
खाजगीत बाळांतपण करू न शकणारी, भरपूर वेळ व पैसा खर्च करून बहूतांशी खाजगी छोटी मोठी दवाखाने करून, तोंडी किंवा लेखी स्वरूपात वैद्यकीय महाविद्यालय संलग्नीत दवाखाण्याला पाठवलेली असतात.! नांदेड हे आरोग्य सुविधासाठी अतिशय जुण्या काळापासून नावाजलेले शहर आहे. हे शहर आंध्र, कर्णाटक, विदर्भ आणि मराठवाडा राज्यांच्या सिमावर्ती भागावर वसलेले प्रसिद्ध शहर आहे. दळन वळनाची उत्तम सुविधा आहे. त्यामुळे शासकियच नाही तर खाजगी दवाखाण्यात सुद्धा रूग्णांची नेहमीच मोठी गर्दी असते. शासकीय सामान्य रूग्णालय असो वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्णित रूग्णालय असो, त्यावर रूग्णसंख्याचा प्रचंड भार राहत आलेला आहे व असणार आहे! वैद्यकीय महाविद्यालयात व संलग्णीत रूग्णालयात आणि अपघात विभागात रूग्णांना सतत चोविस तास तात्काळ सेवा दिली जाते.
डिन (वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रमुख), सर्व विभाग प्रमुख, डॉक्टर्स, नर्सेस, अटेंडन्टस् , शिकाऊ डॉक्टर्स, शिकाऊ नर्सेस मिळून सर्व प्रकारचे विद्या दान,रक्त दान,अवयव दान,देह दान प्रबोधन व कार्य तुटपूंजा मनुष्यबळावरही अहोरात्र करतात. कसल्याही परिस्थितित संसर्ग जन्य आजाराच्या साथीच्या आजारात स्वतःचा जिव धोक्यात घालून आप्त परिवाराची पर्वा न करता, चोविस तासच नाही तर अनेक दिवसही ,उपास पोटी,ऊभ्या ऊभ्याने जिवंत राहाण्यासाठी चहा-पाणी करून, क्षणभराची उसंत न घेता रूग्णांचे प्राण वाचवितात(कोरोना काळात हे नांदेड वाशीयांनी पाहिले व अनुभवलेही आहे).पण दुर्दैव असे की रोज किती प्राण वाचविले जातात याची नणना न करता तथा पहाता फक्त रोज दगावतात काती? याचाच लेखा जोका पाहिला जातो ! हे दगावलेले रूग्ण डॉक्टर्स,विभाग प्रमुख तथा संस्था प्रमुखाच्या दुर्लक्षतेमुळेच झाला असा चुकाचा निष्कर्ष काढला जातो.कांही अंशी तेसे झाले असेलही पण सर्वस्वी दोषी तोच असतो का? आहे का? हेही पहाने अवश्यक आहे.
या सर्व गोष्ठीस कारणीभूत कर्मचारी संख्या, रूग्णसंखेवर लागणारी संख्या, तज्ञ नर्सेस, रूग्ण सेवा प्रिय कर्मचारी संख्या, लागणारी यंत्र सामूग्री, तंत्रज्ञ, अत्यावश्यक औषधी साठा, विशिष्ठ परिस्थितित तात्काळ लागणारी औषधी खरेदीची परवाणगी, संस्था प्रमुखाला सर्वांचे सहकार्य, लोकप्रतिनिधींची वेळोवेळी भेट, मार्गदर्शन, विचारपूस, पाठपूरावा, शासनस्थरावर आरोग्य साठी व शिक्षणासाठी खास मोठी तरतूद आदि व्यवस्था सक्षम करणे गरजेचे आहे.
……डॉ.हंसराज वैद्य नांदेड, 7887833198