गुरुजी रुग्णालयात “जेष्ठ नागरिकांकरिता सर्वांगीण मोफत आरोग्य तपासणी” शिबिराचे आयोजन
नांदेड| सध्या वातावरणातील बदलामुळे अनेक जेष्ठ नागरिकांना विविध आरोग्यविषयक तक्रारींना सामोरे जावे लागत असल्याने अशा जेष्ठांना या वातावरणात आवश्यक असणा-या सर्व शारिरीक चाचण्या करण्याचे औचित्य साधून तसेच श्री मथूराशांती प्रतिष्ठान, नांदेड च्या जनक स्वर्गीय “श्रीमती शांताबाई डॉ. मथुरादास बजाज” यांच्या ६ व्या पुण्यतिथी स्मरणार्थ “श्री. गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड” येथे जेष्ठ नागरिकांकरिता सर्वांगीण मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दि-३१/१२/२०२३ रोजी सकाळी. ९.०० ते दु. १-०० पर्यंत करण्यात आले आहे.
या शिबिरात जेष्ठ नागरिकांकरिता विनामूल्य मसाज, BMD मशीनद्वारे हाडांची ठीसुळतेची तपासणी, फिजिओथेरपी, मधुमेह चाचणी, दंतरोग तपासणी, रक्तदाब-ब्लड शुगर तपासणी व ECG, दैनंदिन दिनचर्चेबाबत योग्य मार्गदर्शन, आजार व आहार संबंधित समुपदेशन संपूर्णतः मोफत करून रुग्णांच्या पूर्वचाचण्या तपासणी केल्या असल्यास त्याबाबत यथोचित मार्गदर्शन देखील केले जाणार आहे.
या शिबिरात सोनोग्राफी, एक्स-रे चाचण्या करिता शिबिरार्थी जेष्ठ रुग्णांना २५ % सवलत देखिल देण्यात येईल. या शिबिराकरिता शिबिरार्थी जेष्ठ नागरिक रुग्णांचे वय ६० पेक्षा जास्त असावे. रुग्णांनी येताना आधार कार्ड सोबत घेऊन यावे, गैरसोय होऊ नये म्हणून पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती व नावनोंदणी साठी संपर्क:-9370638837/02462-267641 साधावा. तरी गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन, श्री गुरुजी रुग्णालयाच्या व्यवस्थापना कडून व्यापक जनहितार्थ करण्यात येत आहे.