नांदेड| नेहरू युवा केंद्राच्यावतीने मॉ जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वाशिम येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नांदेडच्या संघाने 8 सुवर्णपदक, 5 रौप्यपदक, 14 कास्यंपदक पटकावत अव्वल आले आहेत.
वाशिम येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत राज्यातील 12 जिल्ह्यातील स्पर्धकांना सहभाग घेतला होता. नांदेड येथून टायगर वॉरीयर्स मार्शल आर्ट कुंग-फू कराटे असोसिएशनचे मुख्य प्रशिक्षक मास्टर संघपाल भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने सहभाग घेतला होता. तसेच महिला स्वयंसिद्धदा नांदेड जिल्हाध्यक्षा रंजना आढाव, हाफ किडो बॉक्सिंगचे सचिव चंद्रकांत आढाव व टायगर वॉरीयर्स संघटनेचे अध्यक्ष दिगंबर कदम (सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक पुणे )यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. झालेल्या स्पर्धेत 34 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यात 8 सुवर्णपदक, 12 रौप्यपदक, 14 कास्यंपदक स्पर्धकांनी मिळविले. पे्रम कांबळे, वैजनाथ आदोडे, कुणाल रायबोले, महेश गोमसकर यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.