इंदिरा गाधी हायस्कूलचे वर्ग मित्र तब्बल२३ वर्षानंतर एकत्र,जुन्या आठवणीना उजाळा

नवीन नांदेडl इंदिरा गांधी हायस्कूल सिडको-२ नवीन नांदेड येथील २००१-२००२ चे माजी विद्यार्थी स्नेह सम्मेलंन निमित्ताने तब्बल २३ वर्षानंतर एकत्र आल्यानंतर जुन्या आठवणी ना उजाळा मिळाला तर गुरूजणांची स्नेह संमेलन मुळे झालेली भेट आंनद व्दिगुणीत करून गेली.
दि. १६ जुन रोजी २००१-०२ चा १० वी वर्गातील जवळ पास चार तुकडी असलेल्या १५० वर्ग मित्र व मैत्रिण स्नेह संमेलन व गुरूजणांचा सत्कार सोहळा माहेश्वरी भवन कौठा येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी तब्बल २३ वर्षानंतर वर्ग मित्र व मैत्रिण एकत्र आल्याने आनंद व्दिगुणीत झाला.
इंदिरा गांधी हायस्कूल हडको, नांदेड वर्ग १० वा सन २००१-२००२ स्नेह संमेलन मेळावा सकाळी ९ ते सायंकाळी ०५ पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या वेळी डॉ ए डी गरड,डी .एस खंदारे,एस व्ही हनुमंते, आर जी बायस, बी.एस.शिरफुले, डी.पी.कोळनुरे, सौ.एम.एन.जायस्वाल, सौ सिंधुताई तिडके, सौ.भगिरथी बच्चेवार,सौ हनुमंते, सौ इनामदार,सौ एम .एम.मेडपलवर, भारत पवार, जी एस. मैलापुरे,बी.एस.शिंदे, सौ कोदंडे, आर. एच.सज्जांके एल.जाधव, बी.बी.जाधव,एक के वाघमारे, भास्करे, एस व्हि.पाटील, यांच्या सह उपस्थित गुरुजनांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार सोहळा करण्यात आला तर वर्ग मित्र मैत्रिण साठी स्नेह सम्मेलन ,आयोजित केले होते.
यावेळी अनेकांनी परिचय व सध्या कार्यरत असलेले नौकरी, व्यवसाय यांच्यी ओळख परिचय मधुन करून दिली तर सकाळी इंदिरा गांधी हास्कूल शाळा व वर्ग पाहुण जुन्या आठवणीना उजाळा मिळाला,व इंदिरा गांधी हास्कूल पासून माहेश्वरी सांस्कृतिक भवन कौठा नांदेड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या ठिकाणी खेळ,जेवण,परिचय समारोप व अल्पोहार विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा रंतकठवार तर आभार शिवानंद पाटील वानखेडे यांनी केले, या स्नेह संमेलन आयोजन गजानन जाधव, शंकर चव्हाण,शिवा तुपतेवार,सागर जोशी, सुजाता सोमाणी,गजानन भास्करे, संतोष गुट्टे,गजानन मिरकुटे,रवि कांबळे, काशिनाथ तोटेवाड,सचिन पंडित, गजानन कळकेकर यांनी केले होते.
