नांदेडराजकिय

माजी आ.वसंतराव चव्हाण यांची काँग्रेसच्या जिल्हा समन्वयकपदी निवड झाल्याने रामपूरकर यांनी केला सन्मान

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीचे संघटनात्मक कामकाज पाहण्यासाठी मुख्य समन्वयकपदी नायगावाचे माजी आ.वसंतराव चव्हाणांची निवड केल्याने दिपक रामपूरकरांनी देगलूरच्या काँग्रेसच्या शिष्टमंडळा सह माजी आ.वसंतराव चव्हाणांचे नायगाव येथील जनसंपर्क कार्यालयात जोरदार स्वागत केले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राजसभेचे खा.अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपासोबत घरोबा केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दुसरे दिगग्ज माजी वसंतराव चव्हाणांच्या हाती जिल्ह्याचे सुत्र देत त्यांची मुख्य समन्वयकपदी पदावर नियुक्ती केल्याने देगलूरचे भूमिपुत्र दिपक रामपूरकरांनी सर्व शिष्टमंडळा सह नायगाव येथील काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात लोकनेते माजी आ.वसंतराव चव्हाणांची भेट घेत मोठ्या उत्साहात त्यांचा सत्कार व सन्मान दिपक कांबळे यांनी केले.

तसेच आगामी लोकसभेचे नेतृत्व करावे अशा भावनाही दिपक रामपूरकरांनी व्यक्त केल्या. यावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते प्रा.रवींद्र चव्हाण,प्रवक्ते दिलीप पांढरे,रमेश शिवणीकर, प्रशांत पाटील मनूरकर, माणिक चव्हाण, किरण कदम दत्ता येवते, शिवराज वरवटे.नागेश गायकवाड,गजानन भोसले यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!