सिडको बालाजी मंदिर येथील भागवत कथेला भाविकांची गर्दी

नवीन नांदेडl श्री भगवान बालाजीं मंदिर सिडकोचा ३४ वा वार्षिक ब्रम्होत्सवा निमित्ताने श्रीमद् भागवत कथा पारायण सोहळा भागवत कथाकार हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या समधुर वाणीतून सुरूवात झाली असून या कथेला परिसरातील महिला भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली आहे.
श्री. बालाजी मंदिर सिडको येथे ३४ व्या वार्षिक बालाजी महोत्सव निमित्ताने ८ ते १६ दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून दि. ८ जुन पासुन हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या भागवत कथेला ऊत्साहात सुरूवात झाली आहे. भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा या सह विविध देवताचे अवतार व अनेक दृष्टांत सांगण्यात आले आहेत. दररोज कथा श्रवण करण्यासाठी महिला व भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे,यजमान म्हणून रामचंद्र शंकरराव कोटलवार हे असून १६ जुन रोजी हभप अनिल महाराज माजलगावकर यांच्या काल्याचा किर्तनाने व महाप्रसादाने सांगता होणार आहे.
या ब्रम्होत्सव कार्यक्रम मध्ये भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष साहेबराव भिमराव जाधव, बाबुराव मारोतराव बिरादार सचिव ,व्यंकटराव कोंडलराव हाडोळे ,विश्वस्त सदस्य तुकाराम मल्लीकार्जुन नांदेडकर,आनंद रामभाऊ बासटवार,डॉ.नरेश शंकरराव रायेवार,गोविंद राजाराम सुकेवार ,पुरुषोत्तम शंकरराव जवादवार,वैजनाथ बालाजी मोरलवार,रामचंद्र शंकरराव कोटलवार,पुंडलिक रावसाहेब बिरादार,सर्व उत्सव समिती श्री भगवान बालाजी मंदिर, सिडको, नांदेड यांनी केले आहे.
