
नवीन नांदेडl शिख धर्माचे पाचवे गुरू महान श्री अर्जुन देवजी शहिदी गुरू पुरूब निमित्ताने अवतार सिंग मित्र मंडळ सिडको व समाज बाधव यांच्या वतीने १२ जुन रोजी सकाळी १० वाजता सिडको परिसरातील संभाजी चौक येथे शरबत वाटप करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संभाजी चौक सिडको नांदेड येथे १२ जुन रोजी अवतार सिंग सोडी मित्र मंडळ यांच्या वतीने प्रसाद व शरबत वाटप केले,यावेळी प्रारंभी विधीवत पुजन करण्यात आले, यावेळी अवतारसिंग सोडी, राजुसिंग टमान्ना,केरसिंग नालेवाले,नाथु रायपतवार,चंचल सिंग जाट,सचिन बारटक्के, जसपाल सिंग लागंरी,निटा बजुवा,यांच्या सह सेवेकरी यांनी नागरीकांना शरबत वाटप केले.
