
नांदेड। विर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त हिंगोली नाका येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात १८५ रक्तदांत्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला. विर शिरोमणी महाराणा प्रतापजी यांच्या जन्मोत्सव दिनानिमित्त ९ जुन रोजी हिंगोली नाका येथील अर्पण रक्त पेढीतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात महिलां नीही सहभाग नोंदविला.
या रक्तदान शिबिरात एकूण 185 रक्तदात्यांनी रक्तदान केले, या शिबिरास अर्पण रक्तपेढीचे संचालक व मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागीरदार, संचालक सुदर्शन अदमनकर ,संचालक कृष्णा भुसेवाड व सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी अथक परिश्रम घेतले व सर्व रक्तदात्यांस छत्री व सन्मानपत्र देवुन सन्मानित करण्यात आले,
रक्तदान शिबिराचे आयोजन महेश ठाकूर,राम जाधव, अनिकेत सिंह परदेशी, संघरत्न जाधव आदीनी केले होते व रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
