बातम्या आली तर च जाग व्हायच का ? हदगाव शहरातील कोलमडलेली वाहतुक व्यवस्था कधी सुरळीत होणार
हदगाव, शेख चादपाशा| हदगाव शहरात राज्य व राष्ट्रीय महामार्ग च्या या नवीन रोड मुळे वाहतुक व्यवस्था सुधारेल अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. माञ या मार्गावर मोठ्या प्रमाणात आतिक्रमण व वाहतुकीचे नियमाचे उल्लंघन दररोज होत आहे. तरी प्रशासन माञ नको ञास म्हणून याकडे दुर्लक्ष करत असल्याने परिणामस्वरुप लहान मोठे आपघाताच्या घटना घडत आहेत. असे असतांना माञ या बाबतीत लोकनेते विविधता राजकीय पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार हदगाव शहराच्या या जीवघेणी समस्या कडे साफ दुर्लक्ष करित असल्याचे दिसुन येत आहे.
परिणाम स्वरुप सध्या ‘प्रशासकीय राज ‘ असल्याने संबंधित आधिकारी आमदार व खासदार यांनी सुचना केली तरच तितके पुरते ऐकतात सध्या ह्यांच लोकप्रतिनिधीचअसल्या समस्या ऐकवायास वेळ नसल्याने अश्या समस्या मांडव्या तरी कुठे हा प्रश्न शहरवासिया समोर उभा टाकलेला आहे. तीन चार वर्षापासून शहरात तालुक्यात राज्य व राष्ट्रीय महामार्गाचे जाळे आहे. त्यामुळे हे महामार्ग प्रशस्त झालेले आहे भविष्यात निर्माण होणारी वाहतुकीची समस्या लक्षात घेता राष्ट्रीय व राज्यमहामार्गाचे काम झाले. माञ यावर नियंत्रण कुणाचे..? हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या महामार्गावर नव्यानेच दोन्ही कडेला अतिक्रमणाने व्यापलेल आहे.
आणखी भर म्हणजे या महामार्गावर दोन्ही बाजुने विविध वाहने उभी करण्यात येतात आटो काळी पिवळी इतर खाजगी वाहनवाल्यांना या ठिकाणी कोणतीच जागा निश्चितच न केल्याने त्यांच्या मणाला वाटेल त्या ठिकाणी वाहने उभे करत आसतांना दिसुन येतात. या विषयी ऐखाद्या वृतमानपञात बातमी आली तरच स्थानिय पोलिस जागे होतात. काही ठराविक केसेस करतात अन् मोकळे होतात. जास्त कोणी विचारल्यास आमच्याकडे पोलिस बल नसल्याने आम्ही काय..? करणार असं देऊन हात वर करतात. कारण या विषयी पोलिसांचे वरिष्ठ आधिकारी कधी तरी हदगाव पोलिस स्टेशनला इतक्या रहदारीतुन वाट काढत भेट देतात आणि लगेच निघून जातात ही वस्तुस्थिती आहे. यामुळे या रोडवर लहान किरकोळ मोठे अपघात होत आहेत. एखादा अतिदक्षता रुग्ण नादेडला अँबुलन्स न्यावयाचे असल्यास त्याला जाण्यासाठी पण अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही वस्तुस्थिती असुन, याकडे माञ प्रशासनाच साफ दुर्लक्ष होत आहे.
आर.टी.ओ. कश्या करिता आहेत …?
हदगाव शहरात व तालुक्यात आपघात होत आसतांना दरवर्षी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडुन मोठ गाजावाजा करुन वाहतुकीच्या नियमांचा कागदोपञी नियमाचे धडे देत जनजागृती करत असल्याचा आव आणत आहे. परंतु ते थेट सर्व सामान्य पालक नागरिक यांचेशी वाहतुकीच्या नवीन नियमा बाबतीत कधी ही संवाद साधलेला दिसुन येत नाही. स्थानिक माध्यमाशी बोलले नाही परिणाम स्वरुप नागरिकांचे वाहतुकीचे नियमाकडे साफ दुर्लक्षा होत असल्यामुळे शहरातील राज्य राष्ट्रीय महामार्गावर हे होणारे आपघात चुकीचे पद्धतीने व वाहतुकीचे नियम तोडल्यामुळे होत आहे. या बाबतीत स्थानीय पोलिस आर टीओ व नगरपालिकाच ‘समन्वय’ आवश्यक आहे. या संबंधी आपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकाकडुन होत आहे…!