
नवीन नांदेड। राष्ट्रीय महामार्ग वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिडको येथे दररोज हजारो वाहने येजा करीत असल्याने दैनंदिन अपघातात वाढ झाली असून सव्हिर्स रोडवर तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे. अन्यथा १ जुलै पासून रास्ता रोको आंदोलन करण्याचा ईशारा माजी मनपा नगरसेविका सौ.वैजयंती गायकवाड यांच्ये प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते भिमराव गायकवाड व शिवसेना सिडको शहर संघटक प्रमोद मैड यांनी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दिलेल्या निवेदनात, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भारत सरकार यांच्या वतीने सिडको नवीन नांदेड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये गेल्या सहा महिण्यापासुन फ्लाय ओव्हरचे बांधकाम चालु आहे. फ्लॉय ओव्हरचे बांधकाम करण्यासाठी सिडकोच्या आंबेडकर चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाडकाम व खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे आंबेडकर चौकातील सव्हीर्स रोड पूर्णपणे ऊखडून गेलेला आहे. या चौकातुन दररोज हजारो स्वयमचलीत वाहनाची ये- जा होत असते. दक्षिण नांदेड आणि उत्तर नांदेड या दोन शहराला जोडणार हा मुख्य चौक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शहर वाहतुक येथूनच होत असते.
फ्लाय ओव्हरचे खोदकाम पाडकाम झाल्यामुळे हा रस्ता रहदारीस योग्य नाही. याच चौकातुन परराज्यातुन येणारी मालवाहू अवजड वाहणे सुध्दा याच मार्गाने जात असतात. त्यामुळे हा रस्ता अपघात स्थळ झाला आहे. येत्या पावसाळ्यात या चौकातुन शहरे वाहतुक सुरुळीत होणे अशक्य तर आहेच पण अपघात होऊन व पादचारी व प्रवाशाना प्राणास मुकावे लागेल म्हणुन या चौकातील सर्व्हिस रोडचे डांबरीकरण होणे आवश्यक आहे.
या पत्राव्दारे सनदशीर मार्गाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास नोटीस देण्यात येते की, दि. 30 जुन 2024 पर्यंत या चौकाचे डांबरीकरण करुन शहर वाहतुक सुरुळीत होईल याची काळजी घ्यावी. अन्यथा 1 जुलै 2024 रोजी सिडकोच्या आंबेडकर चौकात सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या परिणामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील असे निवेदन दिले असून या निवेदनाचा प्रति नांदेड जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड, व पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड यांना देण्यात आल्या आहेत.
