
हिमायतनगर। शहरातील वार्ड क्रमांक 1 ते 17 मधील सर्व दुर्गंधीयुक्त नाल्याची सफाई करून शिवरात्री महोत्सव पूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक पथदिवे तात्काळ सुरू करा. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष कुणाल भाऊ राठोड यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
गेल्या काही महिण्यापासून हिमायतनगर शहरातील सर्वच वॉर्डातील स्टेट लाईट म्हणजे पथदिवे बंद आहेत. त्यामुळे शहरात सर्वत्र काळोख पसरला आहे, यामुळे नागरिकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागतो आहे. आगामी काळात म्हणजे7 तारखेपासून हिमायतनगर शहराचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराची महाशिवरात्री यात्रा व मुस्लिम बांधवांचा रमजान महिन्याला सुरुवात होणार आहे
या धार्मिक उत्सव काळात भाविक भक्तांना अडचण होणार नाही यासाठी तात्काळ शहरातील पथदिवे चालू करण्यात यावी. आणि शहरातील नात्यांमधील घान साफ करून विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शहरवासीयांच्या वतीने माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी आज दि 4 मार्च रोजी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे कार्यालयीन अधीक्षक चंद्रशेखर महाजन यांच्या माध्यमातून निवेदन देऊन केली आहे.
नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ या निवेदनाची दखल घेऊन शहराच्या स्वच्छतेसह पथदिवे चालू करून दिलासा द्यावा अन्यथा शिवसेना स्टाईलने नगर पंचायत विरोधात आंदोलन करू असा इशारा माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी दिला असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे, संघटक संजय काईतवाड, माजी उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार, राम नरवाडे, सरदार खान पठाण, कल्याणसिंह ठाकूर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
