नांदेड| नांदेड जिल्हा मुद्रक संघाच्या वतीने महाराष्ट्र मुद्रण परिषदेची सभा नांदेड येथे आयोजित केली होती. सदरील कार्यक्रमात मुद्रण परिषदेची सभा अत्यंत शांततेत पार पडली. सर्व महाराष्ट्रातून परिषदेचे पदाधिकारी उपस्थीत होते.

यावेळी पत्रकार अधिस्वीकृती राज्य समितीवर निवड झालेले तथा दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, लातूर विभागीय अधिस्विकृती समितीवर निवड झालेले अध्यक्ष विजय जोशी, सदस्य प्रल्हाद उमाटे, अमोल आंबेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. व सोबतच अधिस्वीकृती पत्रकार तथा मुद्रण परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेकर, मुखेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी कोनापुरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दुसर्‍या सत्रात नांदेड जिल्हा मुद्रक संघाचे सर्व ठराव शांततेत व सर्व मुद्रक बांधवांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब अंबेकर यांनी सर्वांना मार्गदर्शन करुन महाराष्ट्र मुद्रण परिषदेची भूमिका व आगामी काळातील कार्यक्रमबाद्दल सविस्तर माहिती दिली. संघटनेच्या मजबुतीसाठी सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व तसेच संघटनेची पुढील आखणी मजबूत बांधण्यासाठी भुमन्ना आक्केमवाड भोसीकर यांचे अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा मुद्रक संघाची नूतन कार्यकारीणी निवडण्यात आली.

त्यामध्ये अध्यक्षपदी देवदत्त देशपांडे, सचिवपदी भारत गट्टेवार तर कार्याध्यक्षपदी प्रशांत बोडखे व अतूल भुरेवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पुढील कार्यकारीणीमध्ये उपाध्यक्ष म. अयुब म. सरवर व संतोष मुगटकर, कोष्याध्यक्ष प्रशांत गुर्जर, प्रवक्ते शिवानंद सुरकुटवार, संघटक आनंद नादरे, सरचिटणीस समीर कुलकर्णी, समन्वयक पत्रकार शिवाजी कोणापुरे, सहसचिव किशन देशमुख, सहकोषाध्यक्ष गणेश लोखंडे, संपर्कप्रमुख अ. वहाब अ.रशीद, प्रसिद्धी प्रमुख मारोती लकडे, सह संघटक अ.रज्जाक अ. गणी तर सल्लागार भुमन्ना आक्केमवाड, श्रीहरी नीलावार, मार्गदर्शक सतीश कुलकर्णी, नंदकुमार केशेटवार, सय्यद मौला व तसेच तालुकाप्रमुख म्हणून विनय दुरकेवार, धनराज श्रीरामवार भोकर, लक्ष्मीकांत मुदिराज उमरी, देविदास मुदकुलवार देगलूर, ज्ञानेश्वर वारकड कंधार, श्रीकांत अग्रवाल मुखेड आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली. यावेळी बहुसंख्येने प्रमुख मुद्रक बांधव उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version