नांदेड। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित काढण्यात आलेली माळेगाव ते चोंडी रथयात्रा श्रीक्षेत्र माळेगाव येथून खंडोबाचे दर्शन करुन परळी वैजनाथ कडे रवाना झाली. ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले जात आहे.

तारीख २७ मे ते ३१ मे २०२४ या कालावधीत हि रथयात्रा असणार आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संभाजीराव धूळगुंडे यांच्या नेतृवाखाली या रथयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. परचंडा हनुमान मंदिर, परळी वैजनाथ, मुकुंदराज, अंबामाता आंबेजोगाई, चाकरवाडी, मन्मथस्वामी, पुण्यश्लोक अहिल्यामातेचे जन्मस्थळ अहिल्यासृष्टी, अहिलेश्वर महादेव या तीर्थस्थळांना भेट दिली जाणार आहे. परळी वैजनाथ,अंबाजोगाई येथे काल यात्रेचे जोरदार स्वागत झाले. अंबाजोगाई येथे आ नमिता मुंदडा यांच्या वतीने यात्रेचे आदरातिथ्य करण्यात आले.

या एतीहासिक रथयात्रेला नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,माधवराव पटणे,जी नागय्या,सुभाष बल्लेवार, सतीश देशमुख तरोडेकर ,तुलसीदास भूषेवार, हरिदास भट्टड,विनायक पाथरकर,डॉ गजानन देवकर, प्रल्हादराव भालेराव,गोपाल पेंडकर,धनंजय उमरीकर, गंगाधर पांचाळ,दिलिप अंगुलवार,पुंडलिक बेलकर, तुकाराम कोटुरवार, चरणसिंग पवार,राजेश मुखेडकर,संजय कदम,बालाजी ढगे, श्रेयसकुमार बोकारे यांनी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ.मुरहरी कुंभारगावे, बालाजीराव काळे, चंद्रकांत पवार, निळकंठराव उराडे, मारुती पवार, बालाजी वडजे सर,गोविंद गोरे, माऊली महाराज, पांडुरंग शिरगिरे, नागोराव बारसे ,गोविंद बाजगीर,पिराजी धुळगंडे, गणपत देवकते,मधुकर पोले ,रेखा बाजरी कांचनलता शेळके, माळसाबाई सपुरे,गंगासागर कुंडलवाडे, संताबाई बाजगीर, शालू बाई पोले,कांताबाई शेवरे,पार्वती बाई सुरनार, गंगाबाई देवकते,पोचलाबाई पांढरे,काशीबाई वडजे,सोनूबाई कोरे हे सहभागी झाले आहेत. यात्रा ३१ मे रोजी चोंडी येथे पोहचणार आहे.

