
हिमायतनगर। नुकताच इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन च्या माध्यमातून जाहीर झाला आहे, यात हिमायतनगर येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन झालेल्या राजा भगीरथ मा.व उच्च मा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचं संस्थेच्या वतीने व शिक्षण प्रेमी पालकांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
सण 2023-2024 या शैक्षणिक वर्षात राजा भगीरथ विद्यालयातुन एकुण 268 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 226 विद्यार्थी उत्तीर्ण असून, शाळेचं एकूण निकाल 84.32 टक्के लागला आहे. यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या = 48, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या = 73, द्वितीय श्रेणीत 64 विद्यार्थी उत्तीर्ण तर तृतीय श्रेणीत 41 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 90% पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे 1)जाधव ऋषीकेश प्रभाकर 96.20, 2)कु. सावळकर रिया मनोज 95.60, 3)कु. सुर्यवंशी सुनाक्षी तानाजी 94, 4)जाधव स्वामीनंद संतोष 93.80, 5)कु.शिंदे मिताली मारोती 93.60, 6)कु.मद्रेवार सेजल सोमनाथ 93.40, 7)मोरे गणेश परमेश्वर 92.80, 8)कु.वाघमारे आरती तुळशीराम 92.60, 9)लुम्दे प्रशांत गजानन. 92.40, 10)राठोड साईनाथ जनार्धन 92.40, 11)मुतनेपाड परमेश्वर विश्वनाथ 90.60, 12)कु.वानखेडे श्रुती आनंदराव 90.40, 13)कु.समृद्धी गिरीश चिंतावार 90.40, 14)कु.देशपांडे स्वराली अमृतेश्वर 90.20 यांचा समावेश आहे.
प्रशालेत असणाऱ्या विषय शिक्षकांच्या कमतरतेवर मात करीत उपलब्ध मेहनती शिक्षकांनी /ज्युनियर शिक्षकांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन करून निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष रमेशराव सागर, सचिव नानासाहेब ताटेवार व सर्व सन्माननीय संचालक मंडळ प्रशालेचे मुख्याध्यापक , पर्यवेक्षक कमलाकर दिक्कतवार ,प्रा. गोविंद माने, शैलेश सागर उत्तरवार , बी आर पवार, कोंडामंगल सर, लोखंडे सर, तामसेटवार, तगलपल्लेवार, थोटे, मॅडम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
