
शिवणी/ किनवट। तालुक्यातील शिवणीसह परिसरात तल्हारी, झळकवाडी,दयाळ धानोरा,गोंडजेवली या गावासाठी शिवणी ते इस्लापुर व शिवणी ते गोंडजेवली तेलंगणा राज्य जाणाऱ्या राज्य सीमा रस्त्यावर संबधित विभागाकडून विद्युत वहिनी जोडणी साठी नवीन विद्युत खांब उभे केले जात आहे. सदरील खांब अतिशय निकृष्ट व बेकादेशीर पणे हे विद्युत खांब अगदी डांबर रस्त्याला लागून उभे केले जात आहे.तर या विद्युत वहिनीच्या खाली अडथळा निर्माण करणाऱ्या अनेक जिवंत झाडे हे दि.२४ जानेवारी रोजी बेकायदेशीरपणे कत्तल करण्यात आले.यात मौल्यवान सागवानसह इतर प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे.सदरील बेकायदेशीर वृक्ष तोडीची माहिती वनविभागाला देण्यात आले होते.पण शेकडो झाडे तोडणाऱ्या संबधित गुत्तेदारावर वन विभाग मेहेरबानपना दाखविला. या प्रकरणी शिवणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कार्लेवाड यांनी दि.१९ मार्च २०२४ रोजी सदरील बेकायदेशीर वृक्ष तोडीचे ठोस व सबळ पुरव्यासाहित उपवनसंरक्षक अधिकारी वन विभाग कार्यालय नांदेड येथे तक्रार दिली होती.सदरील तक्रारीच्या अनुषंगाने २६ मार्च २०२४ रोजी सहाय्यक वनसंरक्षक यांना पत्र दिले.
या अनुषंगाने सहाय्यक वनसंरक्षक यांनी दि ०३ एप्रिल रोजी तक्रारदार यांना पत्राद्वारे कळविण्यात येते की,आपण दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ठोस व सबळ पुरावे सादर करावे अन्यथा शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्र-शाकाप २०१५ प्र.क्र.५/१८ रवका मंत्रालय मुंबई २५ फेब्रुवारी २०१५ आधारे तक्रार ही खोटी समजून निकाली काढण्यात येईल असे पत्राद्वारे कळविले आहे.या वरून हेच सिद्ध होते की,सदरील तक्रारदाराने सबळ व ठोस पुरावे देऊन सुद्धा तक्रार खोटी समजले जात असेल तर वन विभागाच्या अधिकाऱ्या कडून संबधित विद्युत वितरण पा.आ. कंपनीच्या गुत्तेदरकडून काही हात मिळवणी झाली का असा प्रश्न निर्माण होत आहे.याचे कारण शेकडो झाडांची कत्तल करून दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी सुद्धा संबधित गुत्तेदारावर अध्याप कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, तामसा, हिमायतनगर, सवाना,जीरोना, कोसमेट, शिवणी,दयाळ धानोरा, गोंडजेवली ते तेलंगणा राज्य सीमा च्या मुख्य डांबरी रस्त्याला लागून पायाभूत आराखडा आरडीएसएस च्या माध्यमातून नवीन विद्युत वाहिनी साठी विद्युत खांब उभे केले जात आहे. सदरील कामात कोणत्याच प्रकारचे कायद्याचे पालन न करता व कोणत्याच प्रकारचे पूर्वसर्वेक्षण न करता बेकायदेशीर पद्धतीने व मनमानी कारोभार करत डांबरी रस्त्यालगत तर अनेकांच्या बंगल्यावरून, काहींच्या प्लॉटिंगमधून, काही समाज मंदिरावरून, शाळा व माध्यमिक शाळेच्या मुख्य प्रवेशदारावरून,तर ग्रामपंचायतीच्या नालीवर खांबे उभे केले आहे.तर अनेक ठिकारी सदरील विद्युत वाहिनी बाजू विनाकारण वळविण्यात आले आहे. अशा स्वरूपात संबतीत विभागाच्या गुत्तेदाराकडून बेकायदेशीर विद्युत खांब उभे केले जात आहे.यात मौल्यवान सागवान व इतर प्रजातीचे वृक्षांची अनधिकृत तोड करण्यात आली.
संबधित गुत्तेदाराकडून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून भविष्यात दैनंदिन जीवनात व नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या विद्युत खांब उभे करून विद्युत वाहिनी जोडण्याचे काम तात्काळ बंद करून शासनाचे झालेल्या नुकसानाचे वसुली करून दोषी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कार्लेवाड यांनी या संदर्भात मुख्य अभियंता परिमंडळ नांदेड व जिल्हाधिकारी, या सोबतच उपवनसंरक्षक वन विभाग नांदेड,उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग किनवट सह इतर विविध ठिकाणी दि.१९ मार्च २०२४ रोजी तक्रारी अर्ज देण्यात आले आहे.
अध्याप संबधित विभागाच्या गुत्तेदारावर कारवाई का होत नाही हा प्रश्न निर्माण झाला असून या अनुषंगाने वनविभाच्या अधिकारी व संबधित विभागाच्या अधिकारी आणि गुत्तेदार यांची काही हात मिळवणी झाली का असे प्रश्न निर्माण होत आहेत.बांधकामादरम्यान विद्युत खांब हटविण्याबाबत विद्युत विभागाला सूचना न दिल्यास जिल्हा प्रशासनाने त्या विभागावर कारवाई करावी. दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे कारण रात्रीच्या अंधारात किंवा दाट धुक्यात या खांबावर आदळल्याने वाहनचालकाचे मोठ्या प्रमाणात वित्त हानी किंवा जीवित हानी सुद्धा होऊ शकते. पूर्वी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात घडले आहेत.
रस्त्यावरील नवीन विद्युत खांबामुळे अपघातास झाल्यास जबाबदार कोण?
शिवणी येथील प्रार्थमिक आरोग्य केंद्र ते अप्पारावपेठ रस्त्यावर व बसस्टँड चौक निर्मल रस्त्यावर नागरिकांची मोठी वर्दळ असते.हे दोन्ही रस्ते शहरातील मुख्य मार्ग आहेत या मार्गावर लहान मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. या मार्गावर पाल टाकून व्यवसाय करणारे बरेच किरकोळ विक्रेते असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांची रेलचेल असते येथे अपघात घडल्यास मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
असे असतांना सुद्धा रस्त्यावरील दुर्लक्ष हे सर्वात आश्चर्यार्ची वाव म्हणजे जि.प.शाळेच्या बाजूला सार्वजनिक सौच्छालयाच्या समोर मधोमध विद्युत रोहित्र आहे जे केव्हाही मोठ्या घटनेला निमंत्रण देत आहेत.तर बसस्टँड च्या मुख्य चौकातील खांब यावर विद्युत तार येण्यापूर्वीच खाली पडण्याचा तयारीत आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जवाबदार कोण गुत्तेदार की,महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण पायाभूत आराखडा कंपनी परिमंडळ कार्यालय ? असा सवाल नागरिकांत होत आहे.
