नांदेड। नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना पिरबुराण नगर येथे काही गुन्हेगारी प्रदृत्तीच्या लोकांनी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. या मागणीसाठी महावितरणच्या सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी दि. ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. यावेळी संयुक्‍त कृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वदडकर यांना निवेदन देऊन उपरोक्त मागणी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील वाघ यांच्यावर दि. रोजी कर्तव्यावर असताना प्राणघातक हल्ला झाला. त्यात ते जखमी झाले असून, अश्या प्रकारे जीवघेणा हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी. या मागणीसाठी महावितरणच्या सर्व संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. संयुक्‍त कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

या निवेदनात विविध मागण्या मांडण्यात आल्या असून, हल्लेखोरांना त्वरित अटक करा, सरकारी केसेसमध्ये महावितरणच्या जनमित्र कर्मचाऱ्यांना पंच म्हणून घेऊ नका, वीज कर्मचारी यांची तक्रार घेताना टाळाटाळ करू नका, पोलिस प्रशासन आणि महावितरण अशी संयुक्‍त मोहीम करावी, वीज कर्मचाऱ्यांना त्या त्या भागात पोलिस संरक्षण मिळण्यासाठी हेल्पलाइन नंबर अथवा कंट्रोल रूम मार्फत सुविधा मिळावी. या मागण्यांचे निवेदन घेऊन महावितरणमधील १३ संघटनांचे प्रतिनिधी आणि जवळपास २०० कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून धडकले.

कोणत्याही भरतीमध्ये, कोणतेही. प्रमाणपत्र काढताना, निवडणुकांमध्ये उमेदवारी दाखल करताना किंवा कोणतेही बँक कर्ज देताना वीज बिल भरलेले असणे बंधनकारक करावे, जेणेकरून जनतेला वीज बिल भरण्याची आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पडण्याची सवय लागेल. ३३ के. व्ही. उपकेंद्र येथे कृषिपंपाचा लोड वाढल्यावर फिडर बंद पडतो किंवा वीज ऊत्पादनापेक्षा वीज मागणी वाढल्यास झिरो लोडशेडिंग घ्यावी लागते. त्यामुळे नाहक तेथील ऑपरेटरची चूक नसताना त्यांना शिवीगाळ किंवा मारहाणसारख्या घटना घडतात. अशाप्रसंगी पोलिस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. यासह विविध मागण्या देण्यात आलेल्या निवेदनात केल्या आहेत. सदर निवेदनावर ईश्‍वरसिंग टेलर, प्रमोद देशमुख, राजकुमार पवार, संजय टाक, राजकुमार सिंदिकर, विजय रणखांब, सुधाकर श्रीरामवार’ सुभाष शिंदे, बालाजी स्वामी, शिवशंकर भालेराव, राजेश सोनकांबळे, हरप्रीतसिंग तबेलेवाले, सुनील टिप्परसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version