नवीन नांदेड। हाँटेल व्यवसायातील प्रसिध्द व्यवसायीक रोहित शास्त्री अडकलवार यांनी दिव्यांग शाळेतील विद्यार्थांना स्नेहभोजन आणि भेट वस्तु देवुन त्या विद्यार्थाच्या कलागुंणाना वाव मिळावा यासाठी संगीत मैफीलीचे आयोजन करत हा सामाजिक उपक्रम राबवत त्याच्या समवेत आनंदोत्सव साजरा केला .
हाँटेल व्यवसायात आपले नावलौकिक करत अनेक भागात ” जो खाणार त्याला मंजुवाले देणार ” अशी म्हण प्रसिध्द करणारे अडकलवार परिवार नांदेड शहरात आहे . या परिवारातील पुजा रेस्टाँरेटचे मालक रोहित शास्ञी अडकटलवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली निमित्य होते समर्थ अनिकेत अडकटलवार या तिन वर्षाच्या नातवाचा १४ फेब्रुवारी जन्मदिवस त्या निमित्याने त्यांनी परिसरातील निवासी अंध विद्यालय वसरणी ,श्रीगुरु गोविंदसिंघ निवासी अंध विद्यालय धनेगाव ,महात्मा गांधी अंपग विद्यालय सिडको, इंदिरा गांधी अपंग शाळा असर्जन , येथील दिव्यांग विद्यार्थांची संगित मैफिलीचे आयोजन दि १४ रोजी पुजा रेस्टाँरेट येथे केले होते .
यावेळी अंध विद्यार्थांनी संगित मैफीलीत विविध चित्रपटातील देशभक्तीपर गित , भावगित ,भक्तीगिताच्या रचनाचे सादरीकर करत श्रोत्याची मने जिकली,यात गौरी मुळे या तिन वर्षाच्या मुलीने “केशवा, माधवा ,तुझ्या नामात रे गोडवा ” हे गित गात तिने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले ,तर भावना लिबांळकर इयता तिसरीच्या विद्यार्थर्नीने देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा हे गित गायले. त्यानंतर अनेकांनी आपल्या गिताचे सादरीकरण करत श्रोत्याची मने जिकली,यावेळी नंदकिशोर अडकटलवार यांनी एक भजन घेवुन या संगित मैफिलीची सांगता केली,सर्वप्रथम समर्थने अंथ विद्यार्थाचा सत्कार करत त्यांना भेट वस्तु देत स्नेहभोजन दिले.
यावेळी अडकटलवार परिवातील रोहित शास्ञी अडकटलवार, राजश्री अडकटलवार, सौ. दर्शना अडकटलवार,आदर्श अडकटलवार, नंदकिशोर अडकटलवार ,शिवाजी पाटील,जगनाथ अंकमवार,सजय मामीडवार ,अवतारसिंघ महाराज, विश्वाभर मंगनाळे,याच्यासह अडकटलवार परिवाराचे मित्र,पत्रकार यांची उपस्थिती होती.