When dying, write a death note : मरतानां देहदान चिठ्ठी लिहून ठेवा-मा.आ. गंगाधराव पटने

नांदेड| देहदान करण्याची इच्छा बाळगून मरतानां देहदानाची चिठ्ठी लिहून ठेवा स्वतःची किर्ती वाढेल असे रोखठोक विचार माजी आमदार गंगाधरराव पटने यांनी व्यक्त केले आहे. अर्पण अवयव दान समिती आणि स्व.मातोश्री रूक्मिणीबाई रायकंठवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हाधिकारी कार्यालय डॉ शंकराव चव्हाण नियोजन भवनात आयोजित देहदान योध्दा पुरस्कार २०२५ वितरणप्रसंगी पटने बोलत होते.
यानिमित्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलकंठ भोसीकर ज्येष्ठ मराठी साहित्यिक देविदास फुलारी, सेवानिवृत्त जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे, निवृत्त समाज कल्याण अधिकारी बापू दासरी ज्येष्ठ पत्रकार गोविंद मुंडकर, कमलाकर जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी यांनी मृत्यूनंतर माणसांचे काय होते ,तो किर्तीरूपी उरतोका अशी प्रतिक्रिया व्यक्त करून देहदान चळवळ यशस्वी करू पहाणा-या ज्येष्ठ पत्रकार माधवराव अटकोरे यांच्या आम्ही सर्व पाठिशी राहू असे आश्वासन दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलकंठ भोसीकर म्हणाले कि आरोग्य विभाग देहदान अवयवदान जनजागृती करीत असते, माधवराव अटकोरे यांचे प्रयत्न निष्फळ जाणार नाहीत म्हणुन सर्व इच्छुकांनी देहदान होकार नमुना भरून द्यावा .
प्रारंभी देवीदास फुलारी यांनी उपस्थितांना देहदान शपथ दिली.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलकंठ भोसीकर आणि माजी आमदार गंगाधरराव पटने यांच्या हस्ते ३६ स्री पुरुषांना देहदान योध्दा पुरस्काराने गौरविले. माधवराव अटकोरे लिखित पार्थिवाचे देणे या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
