वाढोण्याची कुलस्वामिनी माता श्री कालिंका मंदिरात आ.जवळगावकरांनी केली सपत्नीक महाआरती; अलंकार सोहळा थाटात संपन्न
हिमायतनगर, परमेश्वर काळे| हिमायतनगर (वाढोणा) येथील नवसाला पावणाऱ्या माता कालिंका मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर सकाळी १० वाजता कांता गुरु वाळके व साईगुरु बडवे यांच्या मधुर वाणीत विधिवत घटस्थापना होऊन मातेचा अभिशेक सोहळा श्री चाटलेवार आणि डॉ.लखपत्रेवार या दोन्ही दाम्पत्यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोणा नगरीची कुलस्वामिनी माता कालिंका देवी मंदिरात नवरात्र उत्सवाला आज घटनस्थापनेपासून सुरुवात झाली आहे. यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कालिंका मातेचा अलंकार सोहळा थाटात संपन्न झाला. त्यानंतर सामूहिक महाराती करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला – पुरुष भाविक भक्त उपस्थित होऊन कालिंका मातेचे आशीर्वाद घेतले. यावेळी प्रसादाचे वितरण झाले, आगामी नऊ दिवस मंदिरात नवरात्रोत्सवाचे विविध धार्मिक – सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार असून, दर्राओज सायंकाळी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजीव रामदिनवार व सचिव संजय मारावार यांनी न्यूजफ्लॅश३६०डॉटइनशी बोलताना दिली आहे.
हिमायतनगर वाढोणा शहराची कुलस्वामिनी माता कालिंका मंदिरात धुमधडाक्यात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. आगामी उत्सव काळात नित्यनेमाने दररोज सकाळी ७ आणि रात्री ७ या वेळेत या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या माता दुर्गादेवीची महाआरती केली जाणार आहे. दि.१६ सोमवार ते दि.२२ रविवार पर्यंत दररोज दुपारी ०१ ते ५ या वेळेत संगीतमय देवी भागवत कथा हभप बाबुराव महाराज तेरकर यांच्या मधुर वाणीत होणार आहे. या कार्यक्रमाचे सौजन्य कै.पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मित्रमंडळास लाभले आहे.
दि.२३ सोमवारी माता कालिंका देवीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी १० ते ०२ वाजेच्या दरम्यान महानवमी, होमहवन व पूर्णाहुती कार्यक्रम त्यानंतर काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. दररोज सप्तसीती पाठाचे वाचन सकाळी ९ ते १२ वाजेच्या दरम्यान पुरोहित कांतागुरु वाळके हे करतील. दि.२४ मंगळवारी दुपारी ०४ वाजेच्या दरम्यान माता कालिंका देवी मंदिरापासून ढोल तश्याच्या गजरात भव्य अशी दसरा मिरवणूक काढून, परत कालिंका मंदिरात आल्यानंतर विजयादशमीचा समारोप केला जाणार आहे. हा उत्सव आनंदाने साजरी व्हावा यासाठी सर्व महिला -पुरुष मंडळी परिश्रम घेत आहेत. नवरात्रोत्सवातील धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन सपत्नीक स्वागत
कालिंका मंदिर ट्रस्टच्या वतीने संपन्न झालेल्या अलंकार सोहळ्या नंतर मंदिर कमिटीच्या वतीने आ. माधवराव पाटील जवळगावकर यांचा शाल श्रीफळ देऊन सपत्नीक स्वागत सत्कार करण्यात आला. प्रसंगी सौ.लताबाई मुलंगे, सौ.सुनंदा दासेवार, सौ.प्रेमाला गुंडेवार, सौ.प्रतिभा नप्ते, सौ.पार्वतीबाई रच्चेवार,सौ.उषा देशपांडे, सौ.संगीता साखरकर आदींसह परिसरातील अनेक नागरिक, महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निशुल्क सेवा देणारा आचारी यांचं अभिनंदन
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी नवरात्रोत्सव काळात आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाच्या कार्यक्रमानिमित्ताने येथील भोजन ग्रहास भेट देऊन पाहणी केली. तसेच निशुल्क सेवा देणारा आचारी यांचं अभिनंदन करत शाळा दस्तीने सत्कार केला. यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी सर, मंदिर कमिटीचे अध्यक्ष राजू रामदीनवार, राजू जयस्वाल, शरद चायल, योगेश चिलकावार, साहेबराव गायकवाड, रामकीशन मादसवार, विष्णू रामदींनवार, गजानन मादसवार, ज्ञानेश्वर पालिकोंडावार, शहराध्यक्ष संजय माने, पापा पार्डीकर, सचिन माने, सुरज दासेवार,पंडित ढोणे आदीसह अनेकजण उपस्थित होते.